‘बिग बॉस ओटीटी’चं विजेतेपद पटकावल्यानंतर अभिनेत्री दिव्या अग्रवाल अधिक चर्चेत आली. दिव्या तिच्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही कायमच चर्चेत राहिली. बॉयफ्रेंड वरुण सूदबरोबर २०२२मध्ये ब्रेकअप करत तिने व्यावसायिक अपूर्व पाडगांवकरसह साखरपुडा केला. मात्र सध्या तिचा एक व्हिडीओ मोठया प्रमाणावर व्हायरल होत आहे. ज्यात तिने दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा उल्लेख केला आहे.
दिव्या अग्रवाल सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते. तिने आपल्या व्हिडीओमध्ये काम न मिळाल्याबद्दलची खंत व्यक्त केली आहे. तिचं असं म्हणणं आहे की गेल्या १५ वर्षांपासून ती काम करत आहे. मात्र तिला चांगले लोक भेटले नाहीत. तसेच ती म्हणाली आहे की “अनुराग कश्यप तुम्ही हे माझे थेट पत्र समजा मला तुमच्याबरोबर काम करायचे आहे. तुमचे पृथ्वी थिएटरमध्ये एक वर्कशॉप बघितले होते तेव्हापासूनच मला तुमच्याबरोबर काम करण्याची इच्छा आहे.”
ती पुढे म्हणाली की “माझ्याकडे अनेक वेबसीरिज, मालिका अशी भरपूर काम आहेत मात्र सध्या मला माझं हृदय जे सांगेल ते काम करायचे आहे. अनुराग कश्यप यांना उद्देशून म्हणाली की माझ्याकडे काम आहे पण मला असं काम करायचं आहे जे तुम्ही करता. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावरून अनेकजण तिला ट्रोलदेखील करत आहेत.
दरम्यान दिव्या अग्रवाल सुरुवातीला अभिनेता प्रियांक शर्माला डेट करत होती. पण जेव्हा प्रियांक बिग बॉस ११ मध्ये सहभागी झाला तेव्हा त्यांची हिना खानशी चांगली मैत्री झाली. त्यावेळी दिव्याने प्रियांकशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले होते. त्यानंतर दिव्याने वरुण सूदला डेट करायला सुरुवात केली. चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघंही लग्न करतील अशी चर्चा असतानाच दोघांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं.