Birthday Special: ‘अशी’ आहे ऐश्वर्या आणि अभिषेकची लव्हस्टोरी

अभिषेकने ऐश्वर्यला अगदी रोमॅण्टिक अंदाजात प्रपोज केल्याचा खुलासा एका मुलाखतीत ऐश्वर्याने केला होता.

aishwarya-rai-birthday
(Photo-Instagram@aishwaryaraibachchan_arb )

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या अभिनयाने आणि सौदर्याने केवळ देशातच नव्हे तर जगभरातील चाहत्यांची पसंती मिळवली आहे. ऐश्वर्याचा आज वाढदिवस आहे. मंगलौरमध्ये ऐश्वर्याचा जन्म झाला असला तरी तिचं कुटुंब मुंबईत स्थलांतरीत झाल्याने तिचं संपूर्ण शिक्षण मुंबईतच पूर्ण झालं. कमी वयातच मॉडेलिंगला सुरुवात करणाऱ्या ऐश्वर्याने अगदी कमी काळात बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करत चाहत्यांच्या मनावर भुरळ घातली होती. चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या ऐश्वर्याची अखेर अभिषेकला कशी भुरळ पडली हा प्रश्न अनेकांना पडला असेल.

ऐश्वर्याच्या वाढदिवसानिमित्ताने आपण अभिषेक आणि तिची खास लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत. २००२ सालामध्ये आलेल्या ‘ढाई अक्षर प्रेम के’ या सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा ऐश्वर्या आणि अभिषेकची भेट झाली होती. यापूर्वी ऐश्वर्या आणि सलमान रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र याचवेळी दोघांचं ब्रेकअपचं वृत्त समोर आलं. त्यानंतर ऐश्वर्या आणि विवेक ऑबेरॉयचं नाव जोडलं गेलं. कालांतराने दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या.

आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर सुहानाची मित्र-मैत्रिणींसोबत हॅलोवीन पार्टी, फोटो व्हायरल

तर अभिषेक बच्चनचादेखील करिश्मा कपूरसोबतचा साखरपूडा मोडला होता. दरम्यान ढाई अक्षर प्रेम के’ च्या सेटवर अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये मैत्री झाली होती. पुढे २००६ सालामध्ये ‘उमराव जान’ सिनेमात दोघांनी पुन्हा एकत्र काम केलं. यावेळी दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांच्या मैत्रीच्या नात्यात प्रेमाचे रंग बहरू लागले. २००७ सालामध्ये दोघांनी लग्नगाठही बांधली.

…आणि भर पार्टीत अंकिताने सगळ्यांसमोरच बॉयफ्रेण्डला केलं किस, सोशल मीडियावर चर्चा


अभिषेकने ऐश्वर्यला अगदी रोमॅण्टिक अंदाजात प्रपोज केल्याचा खुलासा एका मुलाखतीत ऐश्वर्याने केला होता. टोरंटो फिल्म फेस्टिवलमध्ये अभिषेकने ‘गुरु’ सिनेमाच्या प्रमोशनवेळी ऐश्वर्याला एक नकली अंगठी देत तिला प्रपोज केलं होतं. तर ऐश्वर्याने देखील प्रेमाची कबुली दिली होती.

२००७ सालामध्ये ऐश्वर्या अभिषेकने मोठ्या थाटामाट लग्न केलं. लग्नानंतर चार वर्षांनी ऐश्वर्या आई झाली तिने आराध्याला जन्म दिला. ऐश्वर्या आणि अभिषेक आपल्या मुलीसोबत कायम वेळ घालवताना दिसतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aishwarya rai bachchan birthday know her love story with abhishek bachchan kpw

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या