Allu Arjun Son Ayaan Cried After RCB Win : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं आयपीएल विजेतेपदाचं स्वप्न अखेर साकार झालं आहे. आरसीबीने अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १९० धावा केल्या आणि पंजाबसमोर १९१ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य गाठण्यात श्रेयर अय्यरच्या संघाला अपयश आलं आणि तब्बल १७ वर्षांनी आरसीबीने आयपीएलच्या चषकावर आपलं नाव कोरलं.

सध्या संपूर्ण देशभरातून आरसीबीच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. याशिवाय बॉलीवूडसह मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटी विराट कोहलीसाठी खास पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त करत आहेत. अल्लू अर्जुनने देखील RCB च्या विजयानंतर खास पोस्ट शेअर करत या संघाचं कौतुक केलं आहे. मात्र, अल्लू अर्जुनपेक्षा आरसीबीच्या विजयानंतर त्याचा ११ वर्षांचा मुलगा अयान प्रचंड खूश झाला होता.

विराट कोहलीच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहून ११ वर्षांचा अयान देखील रडू लागला. याचा खास व्हिडीओ अल्लू अर्जुनने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. RCB जिंकल्यावर अयान जमिनीवर लोळण घेऊन रडल्याचं यावेळी पाहायला मिळालं. एवढंच नव्हे तर यानंतर अयान इतका इमोशनल झाला की त्याने स्वत:च्या अंगावर पाणी ओतून घेतलं. अल्लू अर्जुनच्या लेकाचं RCB प्रेम पाहून सगळेजण भारावून गेले आहेत.

“RCB जिंकल्यावर अयान प्रचंड भावुक झाला होता. विराट कोहलीचा तो खूप मोठा चाहता आहे. अयान तू खूप गोड आहेस… माय चिनी बाबू…” असं कॅप्शन अल्लू अर्जुनने या व्हिडीओला दिलं आहे.

अल्लू अर्जुनने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “अयान RCB चा क्रेझी फॅन आहे”, “अयानसारखीच आमचीही अवस्था झाली होती”, “अयान टीमचा खरा फॅन आहे” अशा प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आरसीबी जिंकल्यावर स्वत: विजय मल्ल्या यांनीही एक्स पोस्ट शेअर केली आहे. “१८ वर्षांनी अखेर आरसीबीने आयपीएलचे विजेतेपद पटकावले. २०२५ च्या स्पर्धेत संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. मनापासून अभिनंदन! ई साला कप नाम दे!!”, असं माल्या यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.