यंदाचा ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजपथावर प्रजासत्ताक दिनाचे संचलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या संचलनात जवळपास १२ राज्यांचे आणि ९ मंत्रालयांचे असे २१ चित्ररथ सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाले होते. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. यावेळी त्यांच्या आईने पंतप्रधान मोदी यांना आशीर्वाद देत यंदाही तेच जिंकतील, असा आशीर्वाद दिला आहे.

अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर त्यांच्या आईचा एक खास व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अनुपम खेर यांची आई दुलारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. इतकंच नव्हे तर या व्हिडीओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना आशीर्वादही देत ​असून यंदाही तेच जिंकणार असल्याचे सांगत आहे.

Case against Sudhakar Badgujar
सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा, सलीम कुत्ता पार्टी प्रकरण
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
Congress Promising 5000 Rs per month for poor families
“गरीब कुटुंबांना दरमहा ५,००० रुपये देणार”, निवडणुकीआधी काँग्रेसची मोठी घोषणा; म्हणाले, “हे आश्वासन नाही, तर…”
Sajjad lone baramulla loksabha
Loksabha Election: बारामुल्लामधून पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत सज्जाद लोन?

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी! मी आईला आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडबद्दल विचारले आणि त्यावेळी तिने तुमच्याबद्दल काय सांगितले त्याचा एक व्हिडीओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आईचे प्रत्येक शब्द हृदयातून येतात. त्यांचे आणि अशा कोट्यावधी मातेचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, असे अनुपम खेर यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे.

‘तारक मेहता…’ मालिकेत परतण्यासाठी दयाबेनने ठेवल्या होत्या ‘या’ अटी, निर्मात्यांनी दिला होता स्पष्ट नकार

या व्हिडीओमध्ये अनुपम खेर आईला विचारतात, “आज तू प्रजासत्ताक दिनाची परेड पाहिलीस का?” यावर त्यांच्या आई म्हणतात, ‘हो मी दोन ते तीन तास परेड पाहिली आणि त्यावेळी मोदी साहेबांनाही पाहिले. त्यांना पाहून मला खूप आनंद झाला. मला माहित नाही की मी त्यांना पाहून इतकी उत्साही का होते? पण मला ते माझ्या मुलासारखे वाटतात.’

यानंतर अनुपम खेर यांनी विचारले की, “मोदीजी आज टोपी घालून चांगले दिसत होते का?” यावर त्या म्हणतात, ‘हो त्यांनी टोपीसोबत मफलर घातले होते. तिकडे खूप थंडी आहे. पण मोदीजी मनाने फार चांगले आहेत. त्यामुळे देव सदैव त्यांच्या पाठीशी असतो. यावेळीही ते निवडणुकीत विजयी होतील. हे मी लेखी देऊ शकते. मानवी दयाळूपणा मानवासाठी उपयोगी असते. त्यांचा स्वभाव फार चांगला आहे. तो एक चांगला माणूस आहे.’

“माझ्या ब्रा चे माप…”, अभिनेत्री श्वेता तिवारीने ब्रा साईज आणि देवाबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य

यावेळी अनुपम खेर आईला सांगतात की, “मग आता मोदींजींना आशीर्वाद द्या. हे ऐकून त्यांच्या आईला फार आनंद होतो आणि ते सांगतात की हो दिला. त्यांना सांगा की माझी आई तुम्हाला खूप चांगला आशीर्वाद देते. २४ तास काळजी नाही, कशाला सुरक्षा ठेवायची, आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. सुरक्षा ठेवू नका, मी आशीर्वाद देण्यासाठी आहे. ते खूप छान माणूस आहेत. जो माणूस स्वतःसाठी चांगला आहे, आपल्या कुटुंबासाठी चांगला आहे, तो संपूर्ण जगासाठी चांगला आहे. माझे आशीर्वाद नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी राहतील.” असे अनुपम खेर यांच्या आई म्हणाल्या.