दक्षिणात्य सुपरस्टार बाहुबली म्हणजेच प्रभास हा नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी प्रभासचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकला नाही. मात्र तरीही या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. ‘राधे श्याम’ या चित्रपटात प्रभासने हस्तरेषा विशेषज्ञाचे पात्र साकारले आहे.

प्रभासने या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे त्याचे कौतुक केले जात आहे. नुकतंच हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने ज्योतिष शास्त्र किंवा हस्तरेषा शास्त्रावर भाष्य केले. यावेळी प्रभासला तुझा नशीब आणि ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला की, “माझा नशिबावर नक्कीच विश्वास आहे, पण माझा ज्योतिष शास्त्र किंवा हस्तरेषा शास्त्रावर अजिबात विश्वास नाही.”

‘पुष्पा’, ‘RRR’ आणि ‘KGF2’ सारखे दाक्षिणात्य चित्रपट सुपरहिट, मग ‘राधे श्याम’ का ठरला फ्लॉप? प्रभासने दिले स्पष्टीकरण

“मी याबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत. त्यामुळे मी कधीच कोणालाही माझा हात दाखवत नाही. मला माहित आहे की हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे आणि संपूर्ण जगाने ते आपल्याकडून आत्मसात केले आहे. पण तरीही माझा त्यावर अजिबात विश्वास नाही”, असेही प्रभासने सांगितले.

‘राधे श्याम’ या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हा बहुभाषिक चित्रपट असून टी-सीरिज यांची प्रस्तुती आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. यूव्ही क्रिएशन्सने तयार केलेल्या या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे. तर हा चित्रपट तमिळ, मल्याळम, तेलगू, कन्नड आणि हिंदी भाषेत ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला.

‘तू लग्न कधी करणार?’ या प्रश्नावर उत्तर देताना अभिनेता प्रभास म्हणाला, “जेव्हा माझ्याकडे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्रभास लवकरच ‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यासोबतच प्रभास हा ‘सलार’ आणि ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटांमध्येही काम करत आहे.