scorecardresearch

हृतिक रोशनने दिले ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये दिसण्याचे संकेत, म्हणाला “आधी हा चित्रपट मग…”

‘ब्रह्मास्त्र’चा दूसरा भाग हा ‘देव’ या पात्रावर बेतलेला असून तो २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

हृतिक रोशनने दिले ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये दिसण्याचे संकेत, म्हणाला “आधी हा चित्रपट मग…”
हृतिक रोशन 'ब्रह्मास्त्र' | hrithik roshan brahmastra

‘ब्रह्मास्त्र’चा पहिला भाग प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. खूप दिवसांनी हिंदी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. हा पहिला भाग जसा प्रदर्शित झाला त्यादिवसापासूनच याच्या दुसऱ्या भागाबद्दल चर्चा व्हायला सुरुवात झाली होती. दुसऱ्या भागात शाहरुख खानची महत्त्वाची भूमिका असेल, ‘देव’च्या भूमिकेत रणवीर सिंग आणि अमृताच्या भूमिकेत दीपिका पदूकोण दिसणार असल्याचंही स्पष्ट झालं. आता मात्र आणखीन एक बॉलिवूड अभिनेता यामध्ये दिसणार असल्याची चर्चा रंगतान दिसत आहे.

अभिनेता हृतिक रोशन यानेच याविषयी खुलासा केला आहे. ब्रह्मास्त्रच्या ३ भागांपैकी दुसऱ्या भागात हृतिक दिसू शकतो असा इशारा खुद्द हृतिकनेच दिला आहे. याबरोबरच ‘रामायण’ या चित्रपटातसुद्धा हृतिक दिसणार असल्याची चर्चा होत आहे. ‘ब्रह्मास्त्र’चा दूसरा भाग हा पूर्णपणे ‘देव’ या पात्रावर बेतलेला असून हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं अयान मुखर्जीने स्पष्ट केलं आहे. या दुसऱ्या भागात हृतिक दिसणार असल्याचं निश्चित झालं नसलं तरी हृतिकने तसे संकेत दिले आहेत.

आणखी वाचा : तब्बल १३ वर्षांनी ‘अवतार’ने पुन्हा रचला इतिहास; बॉक्स ऑफिसवर केवळ ३ दिवसात कमावले इतके कोटी

‘ब्रह्मास्त्र २’ मध्ये हृतिक दिसणार का? यावर पीटीआयशी संवाद साधताना हृतिक म्हणाला, “खरं सांगायचं झालं तर असं काहीच घडत नाहीये, आता मी माझ्या ‘फायटर’ या चित्रपटाच्या तयारीसाठी वेळ काढणार आहे, आणि त्यानंतरच इतर चित्रपटांवर (तुम्ही विचारलेल्या प्रोजेक्टबद्दल) मी विचार करेन, त्यासाठी मी खूप आशावादी आहे.” हृतिकने सरळसरळ उत्तर द्यायचं जरी टाळलं असलं तरी ब्रह्मास्त्रच्या दुसऱ्या भागात तो दिसू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही.

हृतिक रोशनचा आगामी ‘फायटर’ हा चित्रपट भारतातील प्रथम एरीयल अॅक्शनपट असणार आहे. हृतिकबरोबर यामध्ये दीपिका पदूकोण आणि अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हृतिक सध्या त्याच्या ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दाक्षिणात्य चित्रपटाचा हा हिंदी रिमेक ३० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हृतिकबरोबर सैफ अली खान, राधिका आपटे यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या