बॉलीवूडमध्ये अनेक स्टार्स गाजलेल्या चित्रपटांमुळे लोकप्रिय झाले असले तरी त्यांच्या चित्रपटातील गाजलेल्या गाण्यांमुळेही त्यांना प्रसिद्धी मिळाली. गाजलेल्या गाण्यांमधील अभिनेता आणि गायकाच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंत केले. यात शाहरुख खान आणि अभिजीत भट्टाचार्य या जोडीचे नाव घ्यावे लागेल या जोडीने अनेक हिट गाणी दिली आहेत. पण मध्यंतरी गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी शाहरुखसाठी गाणे बंद केले होते. त्यांनी यावर खुलासा केला होता. त्यानंतर काही दिवसांनी प्रसिद्ध गायिका दुआ लिपाने तिच्या ‘लेव्हिटेटिंग’ गाण्यासह शाहरुख खानच्या ‘बादशाह’ चित्रपटातील प्रसिद्ध ‘वो लड़की जो’ चे फॅन-मेड मॅशअप गाणे गायले यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. अभिजीत म्हणाले की, “गाणं आधी गायकाचं होतं, त्यामुळे गायकाचं नाव घेणं महत्त्वाचं आहे, केवळ अभिनेत्याचं नाही.”

आता अभिजीत यांनी शाहरुखबरोबरच्या दशकभराच्या कामगिरीबद्दल आणि त्यांच्या नात्याबाबत भाष्य केले. अभिजीत भट्टाचार्य यांनी १९९०च्या दशकातील शाहरुख खानच्या अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.

हेही वाचा…“दुबईत तुरुंगात असताना विक्कीने मला…”, ममता कुलकर्णीचा मोठा खुलासा; बॉलीवूड कमबॅकबद्दल म्हणाली…

शुभंकर मिश्रा यांच्या यूट्यूब चॅनेलवरील पॉडकास्टमध्ये बोलताना या संवादादरम्यान अभिजीत यांनी सांगितले की, त्या काळात अनेक गाण्यांवर ते नाराज होते आणि त्यांनी अनेक गाणी गाण्यास नकार दिला, कारण त्यांना ती रचना आवडत नव्हती. ते म्हणाले, “मी खूप निवडक होतो, आणि मी ठरवलं की शाहरुखसाठीच गाईन, दुसऱ्या कुणासाठी नाही. मात्र, यामुळे समस्या निर्माण झाली.”

दुबईतील एक प्रसंग

अभिजीत यांनी पुढे सांगितले, “दुबईत एका पुरस्कार समारंभात मला ‘तुम्हे जो मैंने देखा’ या गाण्यासाठी पुरस्कार मिळाला. स्टेजवरून खाली उतरत असताना, एका अभिनेत्याने मला थांबवलं आणि म्हणाला, ‘अरे!तोतऱ्यासाठी गातोयस का तू?’ दोन लोकांनी एकत्र हे विधान केलं. मी हादरलो! त्यांनी हे असं का म्हणावं? मला गाण्यासाठी पुरस्कार मिळालाय, त्यात हे असं का वाटावं?”

हेही वाचा…Video: मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकर व आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी साधेपणाचं करताहेत कौतुक

गायक ते शो-आयकॉन प्रवास

अभिजीत म्हणाले, “त्या अनुभवानंतर माझा पार्श्वगायनाचा रस कमी झाला आणि मी माझ्या शो आणि कॉन्सर्टवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. आजही मी त्यात आनंदी आहे.”

हेही वाचा…Video : ऐश्वर्या राय बच्चनचा आई अन् लेकीबरोबरचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “तीन पिढ्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिजीत यांनी शाहरुखसाठी दिलेली हिट गाणी

अभिजीत यांनी शाहरुखच्या चित्रपटांसाठी अनेक हिट गाणी दिली आहेत, यात ‘तुमने जो मैंने देखा'(मैं हूँ ना), ‘तौबा तुम्हारे इशारे’ (चलते चलते), ‘चाँद तारे’ (यस बॉस), आणि ‘जरा सा झूम लूं मैं’ (दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे) यांचा समावेश आहे.