दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा ‘हेरा फेरी’ चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आजही हा चित्रपट अनेकजण आवर्जून बघतात. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाचा हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. २००६ मध्ये या फ्रेन्चायझीचा दुसरा चित्रपट ‘हेरा फेरी २’ प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. आता प्रेक्षक तिसऱ्या भागाची वाट बघत आहेत.

तिसऱ्या भागाबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे ती म्हणजे या चित्रपटात बॉलिवूडचा सध्याचा स्टार दिसणार आहे तो स्टार म्हणजे कार्तिक आर्यन. अभिनेते परेश रावल यांनी आपल्या ट्वीटर ही माहिती दिली आहे. एका चाहत्याने त्यांना असं विचारले की ‘सर कार्तिक आर्यन हेरा फेरीच्या तिसऱ्या भागात दिसणार का?’ यावर परेश रावल यांनी रिप्लाय दिला ‘हो हे खरं आहे.’ त्यांच्या या ट्वीटने कार्तिक आर्यनच्या चाहत्यांना आनंद होणार आहे. अक्षय कुमारला ‘हेरा फेरी ३ ‘ची स्क्रिप्ट आवडली नाही अशी चर्चा माध्यमात आहे.

अभिनेत्री मनीषा कोईराला राजकीय आखाड्यात, ‘या’ पक्षासाठी करणार प्रचार

२०२१ मध्ये हेरा फेरी फ्रेन्चायझीच्या निर्मात्यांनी, फिरोझ नाडियादवाला यांनी बॉलिवूड हंगामाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी ‘हेरी फेरी ३’ ची घोषणा केली होती. या चित्रपटाबाबत संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र ‘हेरा फेरी ३’ बद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्तिकने अवघ्या काही वर्षात बॉलिवूडमध्ये आपले नाव कमावले आहे. ‘भूल भुलैय्या २’ नंतर कार्तिक ‘फ्रेडी ‘चित्रपटातून कार्तिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या तो ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.