‘आदिपुरुष’ हा या वर्षीच्या बॉलीवूडमधील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. अखेर काही वेळापूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित होताच काही वेळातच या चित्रपटाला यूट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळाले. आता अभिनेत्री अमृता खानविलकर हिने हा चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रतिक्रिया दिली आहे.

‘आदिपुरुष’चा ट्रेलर सर्वत्र व्हायरल होत आहे. या ट्रेलरवर लाइक आणि कमेंट्स वर्षाव करत नेटकरी त्यांना हा ट्रेलर आवडल्याचं सांगत आहेत. प्रभास, क्रिती यांच्या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते या ट्रेलरवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिनेदेखील हा ट्रेलर पाहिला आणि तिला तो खूप आवडला आहे.

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनाबाबत देवदत्त नागेचा मोठा खुलासा, म्हणाला…

काही वेळापूर्वी क्रितीने ‘आदिपुरुष’चं एक पोस्टर शेअर करत या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याची घोषणा केली. त्यावर अभिनेत्री अमृता खानविलकरने कमेंट करत प्रतिक्रिया दिली. क्रितीच्या या पोस्टवर अमृताने कमेंट करत लिहिलं, “खरोखर अप्रतिम क्रिती… दैवी.” क्रितीच्या पोस्टवर अमृताने केलेली ही कमेंट आता खूप चर्चेत आली आहे.

हेही वाचा : ओम राऊतने उघड केलं ‘आदिपुरुष’ चित्रपटाबद्दलचं मोठं गुपित; म्हणाला, “‘मार्व्हल’ आणि ‘अवतार’ सारखे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या ट्रेलरमध्ये श्रीराम हे लक्ष्मण आणि सीतेबरोबर वनवासात जातात. इथपासून रावण आणि त्याच्या सैन्याला हरवून ते सीतेला परत आणतात, हे सर्व दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसेल. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हा चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.