शाहरुख खानने नुकतंच २ नोव्हेंबरला आपला ५८ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त शाहरुखवर अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता. शाहरुख खानने वाढदिवसानिमित्त एका ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बी टाऊनमधील अनेक कलाकार सहभागी झाले होते. दरम्यान, शाहरुखच्या या ग्रँड पार्टीतला एक इनसाईड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा- Video : “आना मेरे प्यार को…”, भर पार्टीत रणवीर सिंहने बायको दीपिका पदुकोणला ‘असं’ केलं इम्प्रेस

व्हिडीओमध्ये अनेक कलाकार पार्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. बॅकग्राऊंडला एक गाणंही ऐकायला मिळत आहे. दरम्यान, पार्टीचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात करीना कपूर, करिश्मा कपूर, आलिया भट्ट, रणबीर कपूर एन्जॉय करताना दिसत आहेत. बॉलिवूड कलाकारांबरोबर अनेक खेळाडूंनींही शाहरुखच्या या पार्टीत हजेरी लावली होती. शाहरुखच्या पार्टीदरम्यान भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी धोनीच्या स्टाईलिश लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुखच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर या अगोदर प्रदर्शित झालेले ‘पठाण’ आणि ‘जवान’ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई केली होती. जगभरात या चित्रपटांनी २००० कोटींचा गल्ला जमवला होता. आता लवकरच त्याचा ‘डंकी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका आहे. राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.