बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख दंगल गर्ल म्हणून ओळखली जाते. फातिमा तिच्या सुंदरतेमुळे आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी ती आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. नुकत्याच एका मुलाखतीत फातिमाने शाहरुख खान आणि आमिर खानमधील आवडता कलाकार कोण आहे? याबाबतचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- Video : “भयानक चालतेय…”, सारा अली खानचा रॅम्प वॉक पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल, म्हणाले…

ह्युमन ऑफ सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत फातिमा सना शेख म्हणाली की, “मी शाहरुख खानची फॅन आहे पण मला वाटते आमिर खानने आपल्याला रंग दे बसंती, पीके, पीपली लाइव्ह असे अनेक चित्रपट दिले आहेत आणि हे सर्व चित्रपट एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. मला ‘कुछ कुछ होता है’ चित्रपट खूप आवडतो. मला शाहरुख खान खूप आवडतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्क फ्रंटबाबत बोलायचं झालं तर, फातिमा लवकरच मेघना गुलजारच्या ‘सॅम बहादूर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. तो सॅम माणेकशॉच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय या दवसांत फातिमा अनुराग बसूच्या ‘मेट्रो’मध्ये दिसणार आहे. सध्या ती या चित्रपटावर काम करत आहे.