गणेशोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. नुकताच पाच दिवसांच्या घरगुती बाप्पांना ढोल-ताशांच्या गजरात निरोप देण्यात आला. अंबानी कुटुंबाकडून मुंबईत भव्य विसर्जन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बाप्पाच्या विसर्जनासाठी अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. अंबानी कुटुंबाने आयोजित केलेल्या विसर्जन सोहळ्याला जान्हवी कपूरने तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियासह हजेरी लावली होती.

हेही वाचा : सांगली ते मुंबई, सई ताम्हणकरच्या ११ व्या घरासाठी प्रिया बापटने शेअर केली खास पोस्ट; म्हणाली, “कष्ट, प्रेम अन्…”

जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया यांचा विसर्जन मिरवणुकीत एकत्र डान्स करत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अभिनेत्री या व्हिडीओमध्ये मोठ्या उत्साहाने नाचत असल्याचं पाहायला मिळत आहेत. शिखर आणि जान्हवीच्या मागे मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी त्याच्या होणाऱ्या बायकोसह मिरवणुकीचा आनंद घेताना दिसला.

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा? ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण, नेटकरी म्हणाले…

जान्हवी-शिखरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अधिकृतपणे कबुली दिलेली नाही. शिखर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात करण, जान्हवी आणि साराने शिखरबद्दल अप्रत्यक्षपणे चर्चा करण्यात केली होती. जान्हवीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ती शेवटची ‘बवाल’ या ओटीटी चित्रपटात झळकली होती. लवकरच अभिनेत्री राजकुमार रावसह ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटात दिसेल. याशिवाय जान्हवी लवकरच तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

हेही वाचा : ‘तुझी आवडती सेलिब्रिटी कोण?’; गौतमी पाटीलनं दिलं कौतुकास्पद उत्तर, म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अंबानींच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. या कार्यक्रमात शाहरुख खान, सुहाना खान, शाहिद कपूर, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, रश्मिका मंदान्ना, अनन्या पांडे आणि खुशी कपूर यांच्यासह अनेक कलाकार सहभागी झाले होते.