दर शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर एक नवीन सिनेमा प्रदर्शित होतो. त्यातील अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम प्रस्थापित करतात. हा विक्रम म्हणजे त्या सिनेमाने केलेली कमाई होय. १०० कोटी, २०० कोटी, ५०० कोटींपर्यंत काही सिनेमे मजल मारत आहेत आणि यासारखे कोटी क्लब हे सिनेमे किती चालले हे ठरवण्याचे परिमाण झाले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेक सिनेमे ब्लॉकबस्टर झाले असले, तरी देशातील पहिला सुपरहिट सिनेमा कोणता? कोणत्या सिनेमापासून ब्लॉकबस्टर सिनेमा ही पद्धत भारतात रूढ झाली हे तुम्हाला माहिती आहे का? भारतातील पहिला हिट सिनेमा हा स्वातंत्र्यपूर्व काळातील होता.

स्वातंत्र्यपूर्व काळात प्रदर्शित झालेल्या आणि भारतातील पहिल्या हिट सिनेमाची कमाई एक कोटी रुपये इतकी होती. ज्ञान मुखर्जी यांचा हा हिट सिनेमा होता. याच सिनेमानंतर भारतात ब्लॉकबस्टर ही पद्धत रूढ झाली. या सिनेमाला गोल्डन जुबली मिळाली. त्या काळात कुठल्याही सिनेमाला वीस ते तीस लाख रुपयांचा गल्ला जमवणं कठीण होतं. त्यावेळी या सिनेमाने एक कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला होता. ‘किस्मत’ सिनेमाने त्याकाळी १.६ कोटी रुपयांची कमाई केली होती.

हेही वाचा…“अमिताभ बच्चन यांनी दिलेली ‘ती’ वस्तू घेतली नाही याचा आजही पश्चाताप”, ‘मोहब्बतें’ फेम अभिनेत्रीने सांगितला किस्सा

बॉलीवूडचा पहिला सुपरहिट सिनेमा

१९४३ मध्ये आलेला ‘किस्मत’ हा सिनेमा भारतातील पहिला सुपरहिट सिनेमा होता. या सिनेमात अशोक कुमार, मुमताज शांती, आणि शाह नवाज यांच्या प्रमुख भूमिका होत्या. काळाच्या पुढे जाणारं चित्रण या सिनेमात होतं. या सिनेमात लग्न न झालेली मुलगी गरोदर होते अशी काही कथा दाखवण्यात आली आहे. अँटी हिरो ही संकल्पना या सिनेमात मांडली गेली.

अन अशोक कुमार रातोरात स्टार झाले

१९४० च्या दशकाच्या सुरुवातीस अशोक कुमार इतर तरुण अभिनेत्यांप्रमाणे उदयास येत होते, परंतु ‘किस्मत’ने त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीच्या शिखरावर नेले. अनेक जण त्यांना भारताचा पहिला सुपरस्टार मानतात. पण, दिलीप कुमार आणि राज कपूरसारखे तारे उदयास आल्यानंतर सुपरस्टार लेबल हळूहळू त्यांच्या नावापासून दूर गेले.

हेही वाचा…मुंबईत Coldplay च्या तिसऱ्या शोची घोषणा; प्रचंड प्रतिसादामुळे तिकीट बुकिंग ॲप झाले क्रॅश, करण जोहर पोस्ट करत म्हणाला…

‘बरसात’ने मोडला ‘किस्मत’चा विक्रम

‘किस्मत’ सिनेमा प्रदर्शनानंतर जवळपास दशकभर सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा होता. १९४८ मध्ये याला तमिळ चित्रपट ‘चंद्रलेखा’कडून आव्हान मिळाले, परंतु तरीही त्याचा रेकॉर्ड ‘चंद्रलेखा’ सिनेमाला मागे टाकता आला नाही. शेवटी राज कपूरच्या ‘बरसात’ने १९४९ मध्ये दोन कोटी रुपयांची कमाई करून ‘किस्मत’चा विक्रम मोडला.

हेही वाचा…पुन्हा प्रदर्शित झाल्यावर ‘तुंबाड’ची जबरदस्त कमाई, पण दुसऱ्या भागाचे दिग्दर्शन करणार नाही राही अनिल बर्वे; स्वतः सांगितलं कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा चित्रपट त्या काळापेक्षा खूप आधुनिक होता, म्हणजे हा सिनेमा त्या काळाच्या प्रचंड पुढे होता. या सिनेमाने भारतीय चित्रपटसृष्टीत ‘अँग्री हिरो’ हे पात्र सादर केलं, जे पारंपरिक नैतिक सीमांपलीकडे जाऊन काम करतं. या सिनेमामुळे अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांसारख्या भविष्यातील आयकॉन्ससाठी अशा भूमिकांचा मार्ग मोकळा झाला आणि बॉलीवूडमधील स्टारडमसाठी एक नवीन मानक स्थापित केलं.