अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग सोहळा १ मार्च ते ३ मार्च दरम्यान जामनगरमध्ये पार पडला. जरी या भव्य सोहळ्यात बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली असली तरी चित्रपट निर्मिता, दिग्दर्शक आणि लेखक करण जोहर या सोहळ्याला अनुपस्थित होता. अंबानींच्या या खास सोहळ्याला न जाण्याच कारण करणने नुकतंच स्पष्ट केलं आहे.

‘इंडिया टूडे’ने दिलेल्या माहितीनुसार, करणला अंबानींकडून प्री-वेडिंग सोहळ्याच आमंत्रण देण्यात आलं होतं आणि या सोहळ्यात त्याचा खास डान्स परफॉर्मन्सही होता. करणचा आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचा एकत्रित डान्स होणार होता यासाठी त्यांनी रंगीत तालिमसुद्धा केली होती. परंतु जामनगरला निघण्याआधीच करणला ताप आला आणि या कारणामुळेचं करणने जामनगरला न जाण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा… धूम्रपान करत आमिर खानने मारल्या चाहत्यांशी गप्पा; प्री-वेडिंग सोहळ्याबद्दल म्हणाला, “मुकेशच्या मुलाच्या लग्नात…”

त्यानंतर, मनीष मल्होत्राने स्टार किड्स अनन्या पांडे, जान्हवी कपूर, सारा अली खान आणि खुशी कपूर यांच्याबरोबर डान्स परफॉर्मन्स केला. २००१ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कभी खुशी कभी गम’ या करणच्या ब्लॉकबस्टर चित्रपटातील ‘बोले चुडिया’ या लोकप्रिय गाण्यावर मनीष अभिनेत्रींबरोबर थिरकला . विशेष म्हणजे, या गाण्यातील कलाकारांसारखे मॅचिंग आऊटफिट्स मनीषने या स्टार किड्ससाठी डिझाइन केले होते.

हेही वाचा… “वनतारा प्रोजेक्ट आमच्या जवळचा”, प्री-वेडिंग सोहळ्यासाठी राधिका मर्चंटने केलेली खास तयारी, खुलासा करत म्हणाली…

हा सोहळा आपल्या तब्येतीमुळे हुकल्याने करणने बुधवारी त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील एक व्हिडीओ शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या व्हिडीओला कॅप्शन देत करणने लिहिले होते, “अनंत आणि राधिका यांचे मनःपूर्वक अभिनंदन! हा सोहळा केवळ नात्यांचा, पाहुणचाराचा आणि प्रेमाचा नव्हता तर आपल्या वैभवशाली भारतीय परंपरेचा होता. प्री-वेडिंगचा हा सोहळा प्रत्येकाच्या मनात असलेल्या प्रेमाचा पुरावा आहे. नीता भाभी, मुकेश भाई, आकाश आणि श्लोका, ईशा आणि आनंद तुम्हाला माझ्याकडून खूप सारं प्रेम.”

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, करणच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, मार्च महिन्यात करणचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा अभिनीत ‘योद्धा’ चित्रपट १५ मार्च २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सारा अली खानचा ‘ए वतन मेरे वतन’ हा आगामी चित्रपट २१ मार्च २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.