Meenakshi Seshadri Amitabh Bachchan Intimate Scenes : बॉलीवूड अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री ही ८० च्या दशकातील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक आघाडीच्या कलाकारांबरोबर काम केल. मग ते अमिताभ बच्चन असो, राजेश खन्ना असो, जितेंद्र, विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा असो. या सर्वांबरोबर तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पण तिने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर एका चित्रपटात बोल्ड सीन्स दिले होते, ज्यांची त्याकाळी खूप चर्चा झाली होती. मीनाक्षी आता त्या बोल्ड सीन्सबद्दल व्यक्त झाली आहे.
मीनाक्षीने सांगितलं जेव्हा तिने प्रीमियरमध्ये चित्रपटातील ते सीन्स पाहिले तेव्हा तिला खूप लाज वाटली होती. ‘गंगा, जमुना सरस्वती’ या चित्रपटात अमिताभ बच्चन व मीनाक्षी शेषाद्री यांच्यावर काही बोल्ड सीन चित्रीत करण्यात आले होते. चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री व बोल्ड सीन्सची प्रचंड चर्चा झाली होती. चित्रपटात एका सीनमध्ये कोल्ड शॉकमुळे बेशुद्ध होते. तिला पुन्हा शुद्धीवर आणण्यासाठी वापरलेली युक्ती खूप बोल्ड होती.
चित्रपट पाहताना लाज वाटत होती – मीनाक्षी
मीनाक्षीने अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या त्या बोल्ड सीनबद्दल प्रतिक्रिया दिली होती. “प्रिमियरमध्ये तो सीन पाहिल्यानंतर मला खूप लाज वाटली होती. असे सीन शूट करणं अजिबात सोपे नाही. ते शूट करण्यासाठी धाडस करावं लागतं. खूप सारे लोक तिथे हजर असताना, सेटवर अनेक कॅमेरे असताना असे सीन शूट करणं सोपं नाही,” असं मीनाक्षी म्हणाली.
मीनाक्षी शेषाद्रीने १९८३ मध्ये ‘पेंटर बाबू’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि त्यानंतर तिला ‘हिरो’ मध्ये काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट हिट झाला आणि ती हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री झाली. सनी देओलबरोबरचे तिचे चित्रपट खूप गाजले. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं.
सेटवर एकच स्वच्छतागृह असायचे
मीनाक्षी शेषाद्रीने अलीकडेच एका मुलाखतीत तिच्या काळातील सेट कसे असायचे आणि शूटिंग करताना काय अडचणी यायच्या, त्याबद्दल सांगितलं. ८०-९० च्या दशकात शूटिंग करणं खूप कठीण होतं. त्यावेळी शूटिंग लोकेशनवर फक्त एकच स्वच्छतागृह होते, ज्याचा वापर सुमारे १०० लोक करायचे. महिलांसाठी वेगळे स्वच्छतागृह नव्हते. एकदा मीनाक्षीला डायरिया झाला होता आणि तिला खूप अनुभव आले होते. डायरिया असूनही तिला भर पावसात शूटिंग करावं लागलं होतं, असं मीनाक्षी म्हणाली होती.