बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा नुकतेच विवाह बंधनात अडकले. २४ सप्टेंबरला राजस्थानमधील उदयपूर येथे परिणीती आणि राघव यांच्या शाही लग्न सोहळा संपन्न झाला. तर आता त्यांच्या लग्नसोहळ्यातले काही फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत.

परिणीती आणि राघव यांच्या लग्नाला त्यांचे जवळचे मित्रमंडळी आणि नातेवाईक उपस्थित होते. २३ सप्टेंबरला राघव आणि परिणीती यांच्या लग्नाचे मेहंदी, हळदी आणि संगीताचे कार्यक्रम झाले. तर २४ सप्टेंबरला ही दोघं लग्न बंधनात अडकली. या संपूर्ण लग्नामध्ये त्यांचा राजेशाही थाट पाहायला मिळाला. तर आता त्यांच्या वरमाला विधीनंतरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

या व्हिडीओमध्ये परिणीती आणि राघव एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घातल्यानंतर फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. आता पुढे काय करायचं असतं? असा प्रश्न परिणीती विचारताना दिसत आहे. तर इतक्यात परिणीतीच्या एका मैत्रिणीने समोरून तिला काहीतरी सांगितलं जे ऐकून परिणीती काहीशी लाजली आणि हसत तिला गप्प केलं. तर नंतर राघवबरोबर फोटोसाठी पोज देताना परिणीती हळूच त्याच्याजवळ गेली आणि त्याला गालावर किस केलं.

हेही वाचा : Video: “परिणीतीला काय गिफ्ट दिलं?” खुलासा करत प्रियांका चोप्राची आई म्हणाली, “त्यांच्या लग्नात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर आता त्या दोघांचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. यावर कमेंट करत नेटकरी आणि त्यांचे चाहते त्यांचा हा रोमँटिक अंदाज आवडल्याचं सांगत आहेत.