scorecardresearch

Video: रिलेशनशिपच्या चर्चांदरम्यान परिणीती चोप्रा व राघव चड्ढा पुन्हा दिसले एकत्र, नेटकरी म्हणाले “आम आदमी…”

परिणीती चोप्रा व राघव चड्ढा पुन्हा झाले स्पॉट, व्हिडीओ व्हायरल

parineeti chopra raghav chadha video
परिणीती चोप्रा व राघव चड्ढा पुन्हा झाले स्पॉट. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. परिणीतीला काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्यासह स्पॉट करण्यात आलं होतं. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर परिणीती व राघव चड्ढा यांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत.

परिणीता व राघव चड्ढा यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करत दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर पंजाबी गायक हार्डी सिंधूनेही परिणीती व राघव चड्ढाला शुभेच्छा दिल्या होत्या. आता या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच परिणीती चोप्रा व राघव चड्ढा एकत्र दिसले आहेत.

हेही वाचा>> Video: नागराज मंजुळेंचा डॅशिंग लूक, आकाश-सायलीची केमिस्ट्री अन्…; ‘घर बंदूक बिरयानी’ टीमशी खास गप्पा

परिणीतीला राघव चड्ढा यांच्यासह एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन या दोघांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. “हे दोघं नक्कीच लग्न करत आहेत”, असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “लाजत आहेत” अशी कमेंट केली आहे. “आम आदमी” असं म्हणत एकाने हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. अनेकांनी परिणीती व राघव चड्ढाला शुभेच्छाही दिल्या आहेत.

हेही वाचा>> Video: आधी हाय हिल्स काढले अन् मग अनवाणी पायांनीच ‘नाटू नाटू’वर थिरकली आलिया भट्ट, अभिनेत्रीचा रश्मिका मंदानाबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स’मध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे. तेव्हापासून ते मित्र आहेत. पण त्यांची प्रेमकहाणी अलीकडेच सुरू झाल्याचं म्हणण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी परिणीती व राघव चड्ढा पंजाबमध्ये भेटले होते. परिणीती तिथे शूटिंग करत होती, तेव्हा दोघेही एकमेकांना भेटले आणि त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 11:44 IST

संबंधित बातम्या