सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड कुतूहल पाहायला मिळतं. अशाच काही सेलिब्रिटींच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणितिचा पती निक जोनास. प्रियांकाने निक जोनासरबरोबर २०१८ मध्ये लग्न केले. ‘मेट गाला २०१७’ नंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि साधारण वर्षभरानंतर ते दोघंही एकमेकांना डेट करत होते. डेटिंगनंतर दोघांनी जोधपूरमध्ये लग्नगाठ बांधली.

प्रियांका आणि निक या दोघांविषयीच्या चर्चा या होतच असतात. अशातच प्रियांका चोप्राचा पती निक जोनास एका कारणाने पुन्हा चर्चेत आला आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने एका पॉडकास्टमध्ये त्याच्याबरोबरच्या नात्याबद्दल दिलेली प्रतिक्रिया. ग्रॅमी पुरस्कार प्राप्त गायिका माइली सायरसने तिचा एकेकाळी असलेला बॉयफ्रेंड निक जोनासबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.

‘एव्हरी सिंगल अल्बम’ या पॉडकास्टमध्ये मायलीने तिच्या आणि निकच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं. यावेळी मायली सायरस म्हणाली, “मला निक जोनास अजूनही आवडतो. खूप आवडतो. निक जोनास आणि मी एकत्र होते, तेव्हा निकने मला संगीत दौऱ्यात सहभागी केले नाही. नंतर तो त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करू लागला. यामुळे माझं मन तुटलं. तेव्हा निक माझ्यापासून दूर जात आहे असं वाटलं.”

मायली सायरसच्या म्हणण्यानुसार, तिने नंतर निक जोनासला विचारले, “तू मला का सोडून जात आहेस? आपण हे एकत्र का राहू शकत नाही का?” पण त्याच वेळी, मायलीला जाणवले की, ती आणि निक दोघेही त्यांच्या त्यांच्या आयुष्यात खूप पुढे गेले आहेत. २००९ च्या ‘माइल्स टू गो’ या पुस्तकात मायलीने पहिल्यांदाच निकबरोबरच्या नात्याबद्दल सांगितले होते. त्यावेळी तिने त्याचा उल्लेख ‘प्रिन्स चार्मिंग’ असा केलेला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशातच अलिकडच्या पॉडकास्टमध्ये, तिने विनोदाने म्हटले की, “मला त्यावेळी जे म्हणायचे होते ते असे होते की, ‘निक जोनासने मला सोडले, तो खूप वाईट आहे. तो एक मूर्ख माणूस आहे’, पण संपादकांनी मला असे म्हणू दिले की, ‘निक खूप चांगला मुलगा नव्हता’.” दरम्यान, २००६-०७ या काळात मायली-निक एकमेकांना डेट करत होते. २००९ मध्ये थोड्या काळासाठी एकत्र आले होते.