Rashmika Mandanna New Movie : लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या ‘कुबेरा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. ‘कुबेरा’ हा चित्रपट २० जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असलेला पाहायला मिळतोय. अशातच आता रश्मिकाच्या नव्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. अभिनेत्री लवकरच एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रश्मिकाने सोशल मीडियावर नुकतीच एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. यामधून अभिनेत्रीने तिच्या नवीन चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. रश्मिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. यामध्ये अभिनेत्री तिच्या आगामी चित्रपटातील लूकमध्ये पाहायला मिळत आहे. रश्मिकाच्या नवीन चित्रपटाचं नाव ‘मैसा’ असं आहे.

रश्मिकाचा या चित्रपटातील लूक उत्सुकता वाढवणारा आहे. अभिनेत्री यामध्ये थरारक लूकमध्ये पाहायला मिळत आहे. नवीन चित्रपटाचं पोस्टर शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “मी नेहमीच काहीतरी नवीन आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते. तसंच माझ्या कामामधून प्रेक्षकांची उत्सुकता वाढावी यासाठीही मी प्रयत्नशील असते आणि हा चित्रपटसुद्धा तसाच काहीसा आहे.”

रश्मिकाने कॅप्शनमध्ये पुढे लिहिलं आहे की, “यापूर्वी मी कधीही असं पात्र साकारलं नव्हतं किंवा कधीही असं जग पाहिलं नव्हतं. मी कधीच स्वत:चं असं रूपही पाहिलं नव्हतं. ही भूमिका खूपच वेगळी आहे, त्यामुळे मला सध्या दडपण आलं आहे, पण मी यासाठी तितकीच उत्सुकही आहे; त्यामुळे ही कलाकृती तुम्ही पाहावी आणि तुम्हाला ती आवडेल यासाठी मी खूप उत्सुक आहे. ही तर फक्त सुरुवात आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रश्मिकाचा ‘मैसा’ हा आगामी चित्रपट हिंदीसह इतर चार दाक्षिणात्य भाषेत प्रदर्शित होणार आहे. रवींद्र पुल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे, तर ‘अनफॉर्म्युला फिल्म्स’ या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रश्मिकासह या चित्रपटात कोणता अभिनेता तसेच कोणते इतर कलाकार झळकणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अद्याप हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.