Salman Khan And Disha Patani Dance: सलमान खान सध्या ‘बिग बॉस’चं १८वं पर्व होस्ट करत नाहीये. गेल्या आठवड्यातील वीकेंडच्या वारमध्ये सलमान खानच्या जागी फराह खान पाहायला मिळाली. याच कारण आहे ‘द-बंग द टूर-रीलोडेड’. सलमान खान सध्या दुबईत आहे. दुबईमध्ये सलमानचा ‘द-बंग द टूर-रीलोडेड’ सुरू आहे. या कार्यक्रमातील जबरदस्त परफॉर्मन्सचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सलमान खानच्या ( Salman Khan ) ‘द-बंग द टूर-रीलोडेड’ या कार्यक्रमात अभिनेत्री तमन्ना भाटिया, सोनाक्षी सिन्हा, दिशा पटानी, प्रभु देवा, सुनील ग्रोवर, मनीष पॉल, आस्था गिल आणि जॅकलीन फर्नांडिस यांनी खास उपस्थिती लावली. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दौऱ्यातील फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत.

हेही वाचा – “बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…

‘इन्स्टंट बॉलीवूड’ या नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर सलमान खानच्या ( Salman Khan ) दमदार परफॉर्मन्सचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत सलमान खान दिशा पटानी आणि मनिष पॉलबरोबर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. सलमान, दिशा आणि मनिष ‘मुझसे शादी करोगी’ गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. तिघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – ‘मंगला’ चित्रपटातील शिवाली परबचा लूक पाहून आई झालेली भावुक; म्हणाल्या, “१२ तास चेहऱ्यावर मेकअप, जेवायला नाही अन्…”

सलमान खान ( Salman Khan ), दिशा पटानी आणि मनिष पॉलच्या या डान्स व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “ब्लॉकबस्ट मेगास्टर सलमान भाई”, “जबरदस्त”, “फक्त सलमान खानसाठी व्हिडीओ लाइक केला”, अशा संमिश्र प्रतिक्रिया या व्हिडीओवर उमटल्या आहेत.

हेही वाचा – दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सलमान खानने ( Salman Khan ) दुबईत जवळची मैत्रीण युलिया वंतूरच्या वडिलांचा वाढदिवस साजरा केला. युलियाने या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. भाईजानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सलमान सध्या अशा कार्यक्रमांसह चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. दुसऱ्या बाजूला त्याच्या ‘सिकंदर’ चित्रपटाच चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकणार आहे. पुढच्या वर्षी २०२५मध्ये सलमानचा ‘सिंकदर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं म्हटलं जात आहे.