Premium

‘दंगल’ चित्रपटापूर्वी सान्या मल्होत्राला मिळाला होता सर्जरी करण्याचा सल्ला; अभिनेत्री म्हणालेली, “भावा…”

दंगल फेम अभिनेत्री सान्या मल्होत्राने एक किस्सा शेअर केला आहे.

sanya
सान्या मल्होत्रा

बॉलीवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​सध्या ‘जॅकफ्रूट’ शोमुळे चर्चेत आहे. २०२३ हे वर्ष सान्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून तिचे ‘जवान’, ‘सॅम बहादूर’सारखे दर्जेदार चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. बहुप्रतीक्षित ‘जवान’ चित्रपटात सान्या बॉलीवूडचा सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. ‘दंगल’ चित्रपटातील सान्याने साकारलेली गीता फोगटची भूमिका गाजली होती. मात्र, या चित्रपटाअगोदर सान्याला एक सल्ला देण्यात आला होता. खुद्द अभिनेत्रीने याबाबतचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Video ‘अ‍ॅनिमल’च्या सेटवरील रणबीर कपूरचा नवा लूक व्हायरल; चित्रीकरणादरम्यानचा व्हिडीओ झाला लीक

एका मुलाखतीत सान्याने सांगितले तिला ‘दंगल’च्या आधी तिच्या जबड्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला एकाने दिला होता. हा सल्ला ऐकल्यानंतर सान्याला आश्चर्य वाटले, सान्याने सल्ला देणाऱ्यालाच विचारले भाऊ हे काय असतं? पुन्हा जबडा कसा बनवायचा? मी याबाबत कधीच ऐकलं नाही.” सान्या पुढे म्हणाली, “मी जशी आहे तशी आनंदी आहे. जेव्हा मी मुंबईत आले होते, तेव्हा बिनामेकअप ऑडिशनला जात होते. घ्यायचं असेल तर घ्या नाही तर मी घरी जाते एवढा आत्मविश्वास माझ्यात होता.”

हेही वाचा- ‘ओम शांती ओम’साठी ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्याने घेतली होती फ्कत १ रुपया फी, म्हणाले, “शाहरुख खान…”

सान्या मल्होत्राच्या ​वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर, सान्या पहिल्यांदा ‘दंगल’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटानंतर सान्या ‘लुडो’, ‘कटहल’, ‘लव्ह हॉस्टेल’, ‘शकुंतला देवी’, ‘हिट’, ‘पगलैट’, ‘बधाई हो’, ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकली. सान्याचे ‘सॅम बहादूर’ आणि शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. ​​’जवान’ चित्रपटात सान्या दुहेरी भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2023 at 18:13 IST
Next Story
शाहरुख नव्हे तर ‘हा’ बॉलीवूड अभिनेता करणार आर्यन खानच्या ‘स्टारडम’ सीरिजमध्ये कॅमिओ