Sara Ali Khan Reveals How She Manages Finances: बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. अभिनेत्री नुकतीच ‘स्काय फोर्स’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. स्काय फोर्समधील तिच्या भूमिकेचे मोठे कौतुकदेखील होताना दिसले.

आर्थिक गुंतवणूकीबाबत सारा अली खान म्हणाली…

आता अभिनेत्री तिच्या चित्रपटामुळे नाही तर तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. साराने तिच्या आर्थिक गुंतवणूकीबाबत वक्तव्य केले आहे. तिच्या आर्थिक बाबींबद्दल खुलासा केला, ती कुठे गुंतवणूक करते आणि तिचे खाते कोण हाताळते याबद्दल माहिती शेअर केली.

सारा अली खानने नुकताच टाइम्स नाऊ समिट २०२५ मध्ये हजेरी लावली होती. यावेळी आर्थिक गुंतवणूकीबाबत सारा अली खान म्हणाली, “माझी आई माझे पैसे हाताळते. अगदी माझे जी पे(Gpay) अकाउंटदेखील तिच्या अकाउंटबरोबर जोडलेले आहे, माझा ओटीपी नंबर तिच्या मोबाईलवर येतात.”

शाळेत असताना जसा इतरांना पॉकेट मनी मिळतो. तसा तुला आता पॉकटे मनी मिळतो का? यावर सारा म्हणाली, “पॉकेट मनी विसरा, मी तिला विचारल्याशिवाय तिकीटदेखील बुक करू शकत नाही.” पुढे ती आर्थिक कुठे गुंतवणूक करते असे विचारले असता अभिनेत्री म्हणाली, “रिअल इस्टेट, शेअर बाजार, सोन्याचे बाँडमध्ये गुंतवणूक करत असल्याचा खुलासा केला.

सारा अली खान अमृता सिंग व सैफ अली खान यांची मुलगी आहे. सैफ अली खान व अमृता सिंगने १९९१ मध्ये लग्नगाठ बांधली होती. मात्र, २००४ मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांना सारासह इब्राहिम अली खान हा मुलगादेखील आहे. त्यानंतर सैफ अली खानने करीना कपूरशी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना तैमूर व जेह ही मुले आहेत. सैफने दुसरे लग्न केले असले तरी त्याचे सारा व इब्राहिमबरोबर उत्तम नाते असल्याचे पाहायला मिळते. अनेक सण-उत्सव ते एकत्र साजरे करतात. सारा, इब्राहिम, जेह व तैमूर यांच्यातील बॉण्डिंगदेखील लक्ष वेधून घेताना दिसते.

जानेवारी महिन्यात सैफ अली खानवर एका अज्ञात व्यक्तीने घरात घुसून चाकू हल्ला केला होता. त्यावेळी हे कुटुंब मोठ्या चर्चेत आले होते. करीना कपूर, शर्मीला टागोर यांच्यासह सारा-इब्राहिमदेखील चिंतेत असल्याचे दिसले होते. आता हे कुटुंब त्यांच्या सुरक्षेची काळजी घेताना दिसते.

दरम्यान, सारासह इब्राहिमने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. नादानियां या चित्रपटात तो दिसला. मात्र, त्याला चित्रपटातील अभिनयासाठी ट्रोल करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.