शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटाची गेले अनेक दिवस चर्चा होती. या चित्रपटाच्या सर्व पोस्टर्सनया, चित्रपटाच्या टीझरला, चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यानंतर या चित्रपटाचे चाहते ‘पठाण’च्या ट्रेलरची आतुरतेने वाट बघत होते. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर अखेर आज प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये शाहरुख खानचा पॉवरपॅक परफॉर्मन्सने चाहत्यांना भुरळ घातली आहे. त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता अशातच किंग खानच्या काही चाहत्यांचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर चर्चेत आला आहे.
‘पठाण’मधून शाहरुख खान ४ वर्षांनी मोठया पडद्यावर पुनरागमन करतोय. मोठ्या ब्रेकनंतर त्याला चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना बघण्यासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत. तर हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून ते या चित्रपटाबद्दलची क्रेझ आणखीनच सक्रियपणे व्यक्त करू लागले आहेत. बॉलिवूडच्या बादशाहला काश्मीरमधून शुभेच्छा मिळाल्या आहेत. काश्मीरी तरुणांनी शाहरुख खानला ‘पठाण’साठी शुभेच्छा देण्यासाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा : ‘वेड’ची यशस्वी घोडदौड, ‘सैराट’पाठोपाठ मोडला ‘या’ चित्रपटाचा विक्रम
शाहरुख खान वॉरियर्स फॅन क्लब या ट्विटर हँडलवरुन शाहरुखच्या चाहत्यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत काही काश्मीरी तरुण बर्फात उभे राहून त्यांनी पठाणचे पोस्टर हातात धरत शहरुखला ‘पठाण’साठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. सर्व काश्मीरी तरुण घोषणाही देत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहीलं, “बच्चे, बुढ़े और जवान, सब देखेंगे पठाण.’ जय हिंद फ्रॉम काश्मीर.”
हेही वाचा : “कमी शिकलेले लोक…” ‘पठाण’ला पाठिंबा देत हनी सिंगचं मोठं वक्तव्य, ए. आर. रहमान यांच्या नावाचाही उल्लेख
दरम्यान, आज ‘पठाण ‘चा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर तासभरातच या ट्रेलरने १ मिलियन व्ह्यूज मिळवले. हा ट्रेलरही चाहत्यांच्या पसंतीस पडला. हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.