Ira Khan and Nupur Shikhare Wedding Reception: आमिर खान व रीना दत्ता यांची लेक आयरा खान नुपूर शिखरेबरोबर नुकतीच लग्नबंधनात अडकली. ३ जानेवारीला नोंदणी पद्धतीने आणि १० जानेवारीला ख्रिश्चन पद्धतीने दोघांचं लग्न झालं. उदयपूरमध्ये आयरा-नुपूरचा शाही लग्नसोहळा झाला. त्यानंतर काल, १३ जानेवारीला मुंबईत आमिरच्या लेकीच्या लग्नाची ग्रँड रिसेप्शन पार्टी झाली. या पार्टीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून ते बॉलीवूडचे दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी अनेक वर्षांनंतर बॉलीवूडचे ३ खान एकत्र पाहायला मिळाले.

एक काळ असा होता, ज्यावेळी शाहरुख खान व आमिर खानमधील तणावाचे वृत्त सतत येत असे. ९०च्या दशकपासून या दोघांमध्ये तीव्र स्पर्धा असायची. शाहरुख व आमिरचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. पण आता वेळ आणि काळही बदलला आहे. त्यामुळे शाहरुख व आमिरमधला दुरावा देखील मिटला आहे. म्हणून काल शाहरुख आपल्या पत्नी गौरी खानसह आमिरच्या लेकीच्या रेसिप्शन पार्टीमध्ये हजर राहिला. याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – आमिर खानच्या लेकीचा रिसेप्शन पार्टीतला लेहंगा तयार करायला लागले होते तब्बल ‘इतके’ महिने, डिझायनर म्हणाली…

याशिवाय सलमान खानने देखील आयरा खान-नुपूर शिखरेच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली होती. सलमान काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये पाहायला मिळाला. यावेळी भाईजान पापाराझींबरोबर मस्ती करताना दिसला. याचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – Video: रिया चक्रवर्तीच्या भावाला पापाराझी म्हणाले बॉयफ्रेंड, अभिनेत्री भडकली अन् मग…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आयरा खान-नुपूर शिखरेच्या रिसेप्शन पार्टीला शाहरुख, सलमान व्यतिरिक्त ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, हेमा मालिनी, रेखा, अनिल कपूर, फरहान अख्तर, टाइगर श्रॉफ, कंगना रनौत, कार्तिक आर्यन, निर्माता रवि भागचंदका, रितेश देशमुख, ए.आर.रहमान, दिलीप जोशी असे अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.