Shefali Jariwala Passes Away at 42 : ‘कांता लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. अभिनेत्रीला मध्यरात्री अंधेरीतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आता तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

शेफालीच्या निधनाची बातमी कुटुंबीयांना समजताच ते देखील तातडीने रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले. सध्या शेफालीचा पती, तिची आई आणि कुटुंबातील अन्य सदस्यांचे भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेफाली ४२ वर्षांची होती, त्यामुळे पोटच्या मुलीच्या निधनाची बातमी ऐकताच तिच्या आईवर मोठा आघात झाला आहे.

शेफालीच्या आईचा रुग्णालय परिसरातील व्हिडीओ पापाराझींनी शेअर केला आहे. शेफालीच्या निधनाती बातमी समजताच संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला होता. अभिनेत्रीची आई प्रचंड बिथरली होती…गाडीत बसून त्या प्रचंड रडत होत्या. हा हृदयद्रावक व्हिडीओ पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. शेफालचे चाहते देखील हळहळ व्यक्त करत आहेत. यावेळी गाडीत बसलेले अन्य कुटुंबीय शेफालीच्या आईला धीर देताना दिसले.

शेफालीच्या निधनाच्या बातमीने तिच्या मनोरंजनसृष्टीतील मित्रमंडळींना देखील धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. रश्मी देसाई, अली गोनी, काम्या पंजाबी अशा अनेक कलाकारांनी भावनिक पोस्ट शेअर करत अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सध्या शेफाली जरीवालाच्या अंधेरी येथील निवासस्थानी फॉरेन्सिक टीम पोहोचली असून, मुंबई पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. शेफालीच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट असून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.