शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तब्बल ४ वर्षांनी तो मोठया पडद्यावर झळकला आहे. ‘पठाण’ चित्रपटाची प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. चाहते चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी करत आहेत. चित्रपटाला मिळणारा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता चित्रपटाचे शोदेखील वाढवण्यात आले आहेत. शाहरुखचे चाहतेच नव्हे मनोरंजन क्षेत्रातूनदेखील शाहरुख खानचे कौतुक होत आहे. पठाणबाबत प्रकाश राज यांनी ट्वीट केले आहे.

प्रसिद्ध अभिनेते प्रकाशराज सोशल मीडियावर सक्रीय असतात. सामाजिक मुद्दे, विशेष करून मोदी सरकारवर ते कायमच टीका करत असतात. शाहरुखच्या ‘पठाण’वर त्यांनी ट्वीटवर लिहले आहे, “बॉयकॉट करणाऱ्यांनो shhh, किंग खान परत आला आहे. कीप रॉकिंग दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम आणि पठाणची संपूर्ण टीम,” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Indian Man who earns Rs 5 crore daily his parents wanted him to pursue PhD Google CEO Sundar Pichai Daily Salary Morning Habits
भारतीय तरुणाला दिवसाचा पगार ५ कोटी, नावाचा जगभर डंका; आई वडिलांची इच्छा होती PhD करावी पण त्यानं..
delhi farmer protest marathi news, trolley times newspaper marathi news, trolley times newspaper delhi farmers protest marathi news
ना ऑफिस, ना प्रेस… ट्रॅक्टरमधून निघणारं जगावेगळं वृत्तपत्र…
Jayant Patil on Ajit pawar letter
‘सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही’, अजित पवारांचं म्हणणं खरं; जयंत पाटील पुढे म्हणाले…
Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…

…तर राज्यभर आंदोलन करू” मनसेचा मल्टिप्लेक्स मालकांना इशारा; म्हणाले, ‘पठाण’ला विरोध…

पठाण’ आज जगभरात प्रदर्शित झाला, पण मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये काही गटांच्या विरोधानंतर चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले होते. पण, हे प्रकरण लवकर मिटवण्यात यश आलं असून दुपारनंतर त्याचे शो सुरू झाले. पहिल्याच दिवशी ‘पठाण’ला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी देशभरातील चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षक अक्षरशः मोठ्या संख्येने रांगा लावत आहेत.

‘पठाण’मध्ये शाहरुखसह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच चित्रपटात सलमान खानची झलक पाहायला मिळणार आहे त्यामुळे प्रेक्षक आता चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत.