बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर ती सक्रिय आहे. व्हि़डीओ आणि पोस्टच्या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान तापसीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तापसी फोटो काढण्यासाठी आलेल्या पापाराझींवर चिडल्याचे दिसून येत आहे.
तापसी पन्नू आणि पापाराझी यांच्यातील जोरदार वाद सगळ्यांनाच माहिती आहे. तापसी अनेकदा पापाराझींना शिष्टाचार शिकवताना दिसत असते. नुकताच तापसीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तापसीला बघताच पापाराझींनी तिचे फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. व्हिडीओमध्ये तापसी पापाराझींना बाजूला सरकरण्यास सांगत आहे. मात्र पापाराझी बाजूला होत नव्हते. अखेर चिडून तापसीने पापाराझींना चांगलच सुनावलं. तापसी म्हणाली, “बाजूला व्हा नाहीतर परत म्हणाल धक्का लागला म्हणून”
पापाराझींवर चिडण्याची तापसीच ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तापसी पन्नू अनेक वेळा पत्रकार आणि पापाराझींवर चिडली आहे. काही दिवसांपूर्वी तापसीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये ती तिच्या कारच्या आत जाताना दिसत होती पण पापाराझींनी तिच्या कारचा दरवाजा धरुन ठेवला होता. यावर ती चांगलीच संतापली होती आणि तिने फोटोग्राफर्सना असं करु नका म्हणत खडसावले होते. तसेच चित्रपटाच्या प्रमोशनच्या एका कार्यक्रमातही तिचे पापाराझींबरोबर वाद झाले होते.
हेही वाचा- यशस्वी उद्योजक आणि शाहरुख खानची पत्नी- गौरी शाहरुख खानचा प्रवास तुम्हाला माहितेय का?
तापसी पन्नूच्या कामाबाबत बोलायचं झालं तर ती शाहरुख खानबरोबर ‘डंकी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. ‘डंकी’नंतर तापसीचे ‘हसीन दिलरुबा’ आणि ‘वो लड़की है कहा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.