बॉलीवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते. आपले व्हिडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते. अभिनेत्रीबरोबर ट्विंकल एक चांगली लेखिका आहे. आत्तापर्यंत तिची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. नुकत्याच एका वृत्तपत्रासाठी लिहलेल्या सदरात ट्विंकलने आपला मुलगा आरवबाबतचा एक किस्सा सांगितला आहे.
हेही वाचा- प्रियांका चोप्राच्या आईने शेअर केला परिणीती-राघवच्या लग्नातील Unseen फोटो, म्हणाल्या…
टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात रविवारसाठी ट्विंकलने एक सदर लिहिलं होतं. या सदरात तिने तिचा मुलगा आरव आणि तिच्या नात्याबद्दल भाष्य् केलं होतं. सदरात ट्विंकलने लिहिले की जेव्हा मी माझ्या आरोग्य विमा एजंटशी संपर्क साधला आणि त्याला विचारले की माझा मुलगा आरव आणि मुलगी नितारा किती वेळा डॉक्टरांना भेटले होते. तेव्हा एजंटने मला सांगितले की तो नितारा बद्दल सांगू शकतो कारण ती अल्पवयीन आहे पण आरवबद्दल काही तपशील देऊ शकत नाही कारण तो आता प्रौढ आहे.
ट्विंकल पुढे म्हणाली, “मला हे आवडले नाही. मी लगेच आरवला फोन केला आणि त्याला त्याच्या खात्याचा पासवर्ड मागितला. पण आरवने मला उद्धटपणे उत्तर दिलं म्हणाला, ‘आई, मी वर्षभरात चारच वेळा भेटलोय आणि तू मला पाठवण्याचा आग्रह केला होता. हे तुला माहीत आहे! मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे आनंदाने देऊ शकतो पण, मी तुम्हाला माझा पासवर्ड नाही देऊ शकत. मी २१ वर्षांचा आहे, १२ वर्षांचा नाही आणि मी माझ्या स्वतःच्या गोष्टी हाताळू शकतो.”
हेही वाचा- Video “आपण निरोप घेऊ शकलो नाही पण…”; सुशांतच्या आठवणीत दिशा पटानी भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाली…
आपल्या मुलाचे असे वागणे पाहून ट्विंकलला खूप वाईट वाटले आणि तिने याबाबत पती अक्षय कुमारशी चर्चा केली. अक्षयने तिला समजावले की त्यांच्या मुलीला सध्या ट्विंकलची गरज आहे. तिने तिच्याकडे लक्ष द्यावे. ट्विंकलने जेव्हा हे सर्व तिची आई डिंपल कपाडियासोबत शेअर केले तेव्हा त्या म्हणालेल्या की, “तू नेहमी माझ्याबरोबर हेच करत आली आहेस. आता तुझा मुलगाही तुझ्याबरोबर तेच करत आहे.”