‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट गेले काही दिवस चांगलाच चर्चेत आहे. ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे कसे धर्मांतर करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना कसे दहशतवादी संघटनांमध्ये सामील करण्यात आले, ही कथा या चित्रपटामध्ये दाखवली गेली आहे. नुकताच या चित्रपटाने कमाईचा २०० कोटींचा आकडा पार केला. या चित्रपटाचा पुढील भाग येणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. आता अखेर निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलवर भाष्य केलं आहे.

‘द केरला स्टोरी’ चित्रपट अजूनही चित्रपटगृहात चांगली कामगिरी करताना दिसत आहे. तर काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना काही निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलची ऑफर दिल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तर आता त्यापाठोपाठ या चित्रपटाचे निर्माते विपुल शाह या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल बोलले आहेत.

आणखी वाचा : “ज्यांना हा चित्रपट प्रोपगंडा वाटतो ते…,” ‘द केरला स्टोरी’च्या वादावर अनुपम खेर यांनी मांडले परखड मत

आता निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी डीएनएला दिलेल्या मुलाखतीत ‘द केरला स्टोरी २’ बनवता येईल, असा इशारा दिला आहे, कारण हा विषय अद्याप संपलेला नाही. ते म्हणाले, “मी आता लाइन चित्रपटाचा भाग नाही, पण तो विषय अजून संपलेला नाही. आम्ही ते विषय सर्वांसमोर आणू. तुम्ही काळजी करू नका.”

हेही वाचा : पहिल्या दिवशी ७.५ कोटींची कमाई करणाऱ्या ‘द केरला स्टोरी’ बनवण्यासाठी आला मोठा खर्च, चित्रपटाच्या बजेटचा आकडा समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता विपुल शाह यांच्या या विधानानंतर ‘द केरला स्टोरी’चा दुसरा भाग येऊ शकतो, अशा चर्चा रंगत आहेत. त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग येणार का? त्यात कोणत्या विषयावर निर्माते भाष्य करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे