scorecardresearch

युवराज सिंगबरोबर जोडलं गेलेलं प्रीती झिंटाचं नाव; क्रिकेटरशी असलेल्या रिलेशनशिपबाबत अभिनेत्री म्हणाली “तो माझा..”

युवराज सिंगबरोबरच्या नात्याबाबत प्रीती झिंटाने केलेलं वक्तव्य होतं चर्चेत

priety zinta yuvraj singh
युवराज सिंगबरोबरच्या नात्याबाबत प्रीती झिंटाने केलेलं वक्तव्य होतं चर्चेत. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूडची डिंपल क्वीन अशी ओळख असलेल्या प्रीती झिंटाने अफलातून अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कला विश्वापासून सध्या दूर असलेली प्रीती तिच्या वैवाहिक जीवनात व्यग्र आहे. चित्रपटांप्रमाणेच प्रीती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती.

प्रीती झिंटाचं नाव बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींबरोबरच उद्योगपतींबरोबरही जोडलं गेलं होतं. आयपीएलमधील टीम खरेदी करणारी प्रीती झिंटा पहिली बॉलिवूड अभिनेत्री होती. पंजाब किंग्जचे मालकी हक्क असलेल्या प्रीतीचं नाव आयपीएलदरम्यान भारताचा स्टार क्रिकेटर युवराज सिंगबरोबरही जोडलं गेलं होतं. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं.

हेही वाचा>> Sidharth-Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाआधी ‘शेरशाह’ चित्रपटातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

प्रीतीने खरेदी केलेल्या पंजाब किंग्जचा युवराज कर्णधार होता. त्यामुळे अनेकदा प्रीती व युवराज एकत्र दिसायचे. युवराजबरोबर अफेअरच्या चर्चा रंगल्यानंतर प्रीती झिंटाने एका मुलाखतीत यावर मौन सोडलं होतं. डीएनएला दिलेल्या मुलाखतीत प्रीतीने युवराज सिंगबरोबरच्या नात्याबाबत भाष्य केलं होतं. “युवराज सिंग हा खूपच साधा आहे. त्याच्याबाबत अशा गोष्टी वाचून मलाच आश्चर्याचा धक्का बसला होता. मी युवराजला भाऊ मानते” असं प्रीती म्हणाली होती. याशिवाय युवराजला राखी बांधत असल्याचंही तिने सांगितलं होतं.

हेही पाहा>> Photos: अटक झालेला राखी सावंतचा पती तिच्यापेक्षा १७ वर्षांनी लहान, जाणून घ्या आदिल खानची एकूण संपत्ती

प्रीती झिंटाने २०१६मध्ये जेने गुडइनफ यांच्याशी लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली. प्रीती सध्या अमेरिकेत वास्तव्यास असून तिला दोन जुळी मुले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 18:53 IST