भारताने विश्वचषक स्पर्धांमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा विजय २००३ मध्ये मिळवला होता. यानंतर २२ ऑक्टोबरला तब्बल २० वर्षांनी भारताने आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडला हरवलं. या विजयासह टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेच्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे. धरमशालामध्ये झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी २७४ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. जाडेजाने ४८ व्या षटकांत चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

हेही वाचा : Video : रणवीर-दीपिकाने २०१५ मध्ये केला होता गुपचूप साखरपुडा, ‘कॉफी विथ करण’मध्ये दोघांचा मोठा खुलासा, नवीन प्रोमो लीक

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात रवींद्र जाडेजाने नाबाद ३९ धावा केल्या, तर विराट कोहली आणि मोहम्मद शमी भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. विराट कोहलीने या सामन्यात श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जाडेच्या साथीने भागीदारी केली. शेवटी भारताला विजयासाठी ५ धावांची आणि कोहलीला शतक पूर्ण करण्यासाठीही ५ धावांची गरज होती. यावेळी विराटने एक शॉट हवेत खेळला आणि तो ९५ धावांवर बाद झाला. विराट कोहलीचं शतक थोडक्यात हुकलं आणि तो सचिनच्या ४९ शतकांची बरोबरी करू शकला नाही. शतक थोडक्यात हुकल्याने कोहलीसह त्याचे चाहते काहीसे नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर नवऱ्याला खंबीरपणे साथ देण्यासाठी अनुष्का शर्माने एक व्हिडीओ शेअर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

हेही वाचा : Video : भिंतीवर वदनी कवळ श्लोक, पुण्यातील जुने फोटो अन्…; ‘असं’ आहे अनघा अतुलचं नवीन हॉटेल, शेअर केला पहिला व्हिडीओ

अभिनेत्री अनुष्का शर्मा भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी मैदानावर उपस्थित नव्हती. परंतु, आपल्या पतीच्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी आणि त्याचं मनोबल वाढवण्यासाठी अनुष्काने आयसीसीच्या सोशल मीडिया पेजवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ विराट ९५ धावांवर झेलबाद होतानाचा आहे. तो व्हिडीओ शेअर करुन अनुष्काने कॅप्शनमध्ये “मला तुझा कायम अभिमान वाटतो”, असं लिहिलं आहे. तसेच दुसऱ्या एका पोस्टमध्ये अनुष्काने विराटला वादळाचा पाठलाग करणारा (स्टॉर्म चेसर) असं म्हटलं आहे.

हेही वाचा : Video: नवरात्र, दसरा का साजरा केला जातो?, शस्त्रांची पूजा का केली जाते? लिटिल चॅम्प्सने दिलं उत्तर, पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अनुष्का शर्मा विराटच्या प्रत्येक कामगिरीचं सोशल मीडियावर कौतुक करत असते. अनेकदा ती लाइव्ह सामना पाहण्यासाठी देखील उपस्थित असते. अनुष्काने विश्वचषक २०२३ मध्ये आतापर्यंत भारत विरूद्ध पाकिस्तान हा सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती.