scorecardresearch

कॉमेडियन भारती सिंहने केले ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचे कौतुक, व्हिडीओ शेअर करत म्हणाली “बाई गं…”

नुकतंच या चित्रपटावर प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह हिने प्रतिक्रिया दिली आहे.

विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चंद्रमुखी या चित्रपटातील गाणी, पोस्टर, ट्रेलर, टिझर सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारत आहे. तर दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. येत्या २९ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार असला तरी आतापासूनच अनेक कलाकार त्याचे कौतुक करताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटावर प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह हिने प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रमुखीच्या इन्स्टाग्राम पेजवर नुकतंच भारती सिंहचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भारती सिंहचे आभार मानले आहेत. तू व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल आणि तुझ्या सहकार्याबद्दल तुझे खूप खूप आभार. तुझे हे शब्द फार मोलाचे आहे. तुला आणि तुझ्या बाळाला खूप आशीर्वाद, असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे.

CID मधील दयासोबत विशाखा सुभेदार शेअर करणार स्क्रीन, फोटो पोस्ट करत म्हणाली…

या व्हिडीओद्वारे भारती सिंहने चंद्रमुखी चित्रपटाचे तसेच लावणी किंग आशिष पाटील याचे विशेष कौतुक केले आहे. “मला फार आनंद होत आहे की माझा मित्र आशिष पाटील याचे चंद्रमुखी या चित्रपटातील गाणे प्रदर्शित झाले आहे. त्याचे आवडते म्यूझिक डायरेक्ट अजय अतुल यांचे हे गाणे आहे. चंद्रमुखी या चित्रपटात त्याने लावणीच्या ज्या अदाकारी केल्या आहेत त्या पाहिल्यानंतर खरंच खूप मस्त वाटलं. ‘बाई गं’ हे गाणं नक्की पाहा. चंद्रमुखीच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा.” असे भारती सिंह म्हणाली.

‘चंद्रमुखी’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी रितेश देशमुखने केले कौतुक, म्हणाला…

‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. दरम्यान ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Comedian bharti singh comment on amruta khanvilkar and addinath kothare starrer chandramukhi movie nrp

ताज्या बातम्या