बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. दीपिका आणि रणवीर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. दीप-वीरचे लाखो चाहते आहेत. पण आता हे दोघं फक्त बॉलिवूडच्या पॉवर कपल पैकी एक नाही तर आशियातील पॉवर कपलपैकी एक आहेत.

आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का

अलीकडेच आशियातील पॉवर कपल्सच्या यादीत बॉलिवूडच्या जोडप्यांनाही स्थान देण्यात आले आहे. चीनच्या साउथ चायना मॉर्निंग पोस्टने २०२२ ची आशिया खंडातील पॉवर कपल्सची यादी तयार केली आहे, ज्यामध्ये चाहत्यांचे आवडते ‘दीप-वीर’ चौथ्या क्रमांकावर आहे. हाँगकाँगचे अभिनेते टोनी लेउंग आणि करीना ल्यू, दक्षिण कोरियाचे सुपरस्टार रेन आणि किम ताए ही आणि सिंगापूरचे फॅन वोंग आणि क्रिस्टोफर ली पहिल्या तीन स्थानांवर आहेत. दीपिका-रणवीरपूर्वी बॉलिवूडची कोणतीही जोडी या यादीत स्थान मिळवू शकली नाही.

आणखी वाचा : “शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही”, आदेश बांदेकर यांच्या पोस्टवर अभिनेत्याचे सडेतोड उत्तर

आणखी वाचा : आलिया प्रेग्नेंट! कंडोम कंपनीने भन्नाट पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपिका-रणवीरची संपत्ती

या अहवालानुसार, २०१८ मध्ये लग्न झालेल्या दीपिका आणि रणवीर यांनी चित्रपट आणि जाहिरातींमधून कमाई केली. २०२२ मध्ये, दोघांची एकूण संपत्ती ही १ हजार २३७ कोटी रुपये असल्याचे म्हटले जातात. दीपिकाची एकूण संपत्ती ही ३१३ कोटी रुपयांची आहे, तर रणवीरची ४४५ कोटींची संपत्ती आहे. यापूर्वी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँड्सने दिलेल्या वृत्ताने दीपिका-रणवीरला बॉलीवूडमधील सर्वात पॉवरफुल कपल म्हटलं आहे.