दिग्दर्शक शकुन बत्रा यांचा आगामी चित्रपट ‘गहराइयां’ सोशल मीडियावर बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सध्या चर्चेत आहे. दीपिकाने या चित्रपटात काही इंटिमेट सीन्स दिले आहेत. अभिनेता सिंद्धात चतुर्वेदीसोबत तिच्या या इंटीमेट सीनची चर्चा सोशल मीडियावर होत असतानाच आता दीपिकानं या सीनवर प्रतिक्रिया दिली आहे.

दीपिका पदुकोणनं लग्नानंतर अशाप्रकारचे सीन दिल्यानं सोशल मीडियावर तिच्या या सीनची जोरदार चर्चा आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत दीपिकानं ‘गहराइयां’मधील तिच्या इंटीमेट सीनवर भाष्य केलं आहे. ती म्हणाली, ‘या चित्रपटाचं दिग्दर्शन शकुन बत्रानं केलं नसतं तर कदाचित मी हा चित्रपटच केला नसता. या चित्रपटात आम्ही बऱ्याच नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. हे सर्व करताना आम्ही कम्फर्टेबल होतो आणि शकुन बत्रा यांनी हे सर्व आमच्याकडून करुन घेतलं कारण त्यांना आमच्यावर विश्वास होता. जर या चित्रपटात काही इंटीमेट सीन आहेत तर ते प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांची उत्सुकता वाढवण्यासाठी नाही तर ती त्या कथेची गरज होती म्हणून आहेत. जर शकुन बत्राच्या जागी इतर कोणी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असतं तर मी यात काम केलंच नसतं.’

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच
Thailand House of Representatives approves same sex marriage
समलैंगिक विवाहाला आता थायलंडमध्येही मान्यता… हा प्रवास आव्हानात्मक कसा ठरला?

याआधी दिलेल्या मुलाखतीत दीपिका म्हणाली होती, ‘गहराइयां या चित्रपटातली भूमिका साकारणं माझ्या फार कठीण होतं. कारण पडद्यावर इंटिमेट होणं हे फार कठीण आणि आव्हानात्मक असतं. जर दिग्दर्शकानं सगळं नीट हाताळलं नसतं तर कदाचित हे शक्य झालं नसतं. आपण याआधी भारतीय चित्रपटसृष्टीत जे पाहिलं नाही ते या चित्रपटातील दृश्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. माझी भूमिका ही ‘बोल्ड’ नाही तर ‘रिअल’ आहे. मी यापूर्वी कधीही अशा पद्धतीची भूमिका केली नव्हती.’

दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य कारवा यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ११ फेब्रुवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अमेझॉन प्राइम व्हिडीओ’वर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन शकुन बत्रा करत आहेत तर करण जोहरचं धर्मा प्रॉडक्शन आणि व्हायकॉम १८ या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.