Latest Entertainment News Today 8 May 2025: १ मे २०२५ ला राज कुमार गुप्ता दिग्दर्शित रेड २ प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. लवकरच, हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा ओलांडणार आहेस.
१ मे ला म्हणजेच गुरुवारी या चित्रपटाने १९.२५ कोटी, शुक्रवारी १२ कोटी, शनिवारी १८ कोटी, रविवारी २२ कोटींची कमाई केली होती. सोमवारी या चित्रपटाने ७.५ कोटींची कमाई केली होती. मंगळवारी या चित्रपटाने ७ कोटींची कमाई केली. तर बुधवारी रेड २ ने ४. ७५ कोटींची कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ९०.५० कोटींची कमाई केली आहे.
याबरोबरच, सध्या मनोरंजनाची पर्वणी सुरू आहे. अनेक नवीन हिंदी, मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मराठी नाटकं रंगभूमी गाजवत आहे. मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आज दिवसभरातील मराठी सिनेमा, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…
Entertainment News Today 8 May 2025: आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या…
"टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा म्हणणं हे सहानुभूतीसाठी नव्हतं", भरत जाधव यांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
अडीच महिन्यांची ओळख, लग्नाची मागणी अन्…, सायली देवधरची लव्हस्टोरी आहे खूपच फिल्मी, म्हणाली…
तारा व भैरवीचा खोटेपणा सर्वांसमोर आणण्यासाठी जगन्नाथ 'ती' गोष्ट करणार; सावलीचा आवाज जाणार अन्…; पाहा प्रोमो
मराठी अभिनेत्रीने विराट कोहलीबरोबर केली जाहिरात, 'त्या' अनुभवाबद्दल म्हणाली, "खुप टेन्शन…"
तू इतका विचित्र अभिनय…; माधुरी दीक्षितचा 'तो' चित्रपट पाहिल्यानंतर मुलांची 'अशी' होती प्रतिक्रिया; अभिनेत्री खुलासा करत म्हणालेली…
"मी समाज सुधारण्यासाठी मालिका करत नाही", लीना भागवत यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, "फक्त माझ्यासाठी…"
विवाहित पुरुषाशी लग्न, दिग्गज अभिनेत्रीने होऊ दिलं नाही बाळ; म्हणाली, "त्यांची पत्नी मुलांसह सेटवर…"
बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरने शेअर केले पतीबरोबरचे अनसीन फोटो; पाहा
बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरने लग्नाच्या ७ व्या वाढदिवसानिमित्त पतीबरोबरचे काही अनसीन फोटो फोटो शेअर केले आहेत. हे फोटो त्यांच्या लग्नातील असल्याचे दिसत आहे. दोघेही पारंपारिक वेशभूषेत सुंदर दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना कॅप्शन लिहित पती आनंद आहुजाला शुभेच्छा देत प्रेम व्यक्त केले आहे.
https://www.instagram.com/p/DJYtbuhTPZ4/?utm_source=ig_web_copy_link
'आई कुठे काय करते' फेम अभिषेक देशमुखने 'असा' साजरा केला पत्नीचा वाढदिवस; पाहा फोटो
'आई कुठे काय करते' फेम अभिषेक देशमुखने पत्नी कृतिकाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. त्याने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
https://www.instagram.com/p/DJYv3Epi95I/?utm_source=ig_web_copy_link
राजकुमार राव-वामिका गब्बीचा Bhool Chuk Maaf चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नाही तर…; Operation Sindoor मुळे निर्मात्यांचा निर्णय
"मूक ड्रिल कधी संपेल?" अमिताभ बच्चन यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर केलेल्या पोस्टवर भडकले लोक, काय घडलं?
सहकलाकारांबरोबर अफेअरच्या चर्चांवर सोनाली बेंद्रेचे वक्तव्य; म्हणाली, "मी एकच चूक…"
जुई गडकरीने ज्युनिअर आर्टिस्ट आणि तंत्रज्ञ मंडळींसाठी केली 'ही' मागणी, अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
आई-वडिलांच्या आठवणीत कोल्हापुरातील घरामध्ये बांधलं स्मारक, भरत जाधव यांनी सांगितली 'ती' आठवण, म्हणाले…
अजय देवगणची ती कृती अन्...; को-स्टारच्या बायकोने खालेल्या झोपेच्या गोळ्या, दवाखान्यात केलेलं दाखल
'ऑपरेशन सिंदूर'नंतर AICWA चे पाकिस्तान कलाकारांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन
'ऑपरेशन सिंदूर'नंतर AICWA(All Indian Cine Workers Association)ने प्रसिद्धी पत्रक जाहीर केले. यामध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान व माहिरा खान यांनी भारत विरोधात केलेल्या वक्तव्यांचा निषेध केला. तसेच ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने पाकिस्तानी कलाकारांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले.
याबरोबरच, इंडस्ट्रीमधील काही लोक पाकिस्तानी कलाकारांबद्दल सहानुभूती व्यक्त करतात. त्यांना पाठिंबा देतात आणि आपल्या देशाच्या भावनांकडे दुर्लक्ष करतात, असे म्हणत टीकादेखील केली. पुढे या प्रसिद्धीपत्रकात लिहिले आहे की आपले राष्ट्र प्रथम आले पाहिजे. भारतीय कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांनी हे ठरवावे की ते देशाबरोबर उभे राहतील की भारताला उघडपणे विरोध करणाऱ्यांना पाठिंबा देतील.
दरम्यान, २२ एप्रिल २०२५ ला काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये २६ पर्यटकांना जीव गमवावा लागला. आता भारत सरकारने या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. बुधवारी मध्यरात्री भारताने पाकिस्तानवर हल्ला केला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या काही तळांवर भारताने हल्ले केले आहेत. एका गुप्त मोहिमेच्या अंतर्गत हा एअर स्ट्राईक केला गेला आहे. या लष्करी कारवाईचे नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ असे होते. त्यानंतर अनेक पाकिस्तानी कलाकारांनी सोशल मीडियावर ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत वक्तव्य केले होते.
https://twitter.com/indiaforums/status/1920375497248199088?t=hdxPM8UWlUFGZiMEcOmsQQ&s=08
"मला लोकांची भीती वाटते", तैमूरने बाबा सैफ अली खानकडे केलेली तक्रार; अभिनेता म्हणाला…
प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटानंतर ४ वर्षांनी पुन्हा प्रेमात? लाडक्या श्वानाचा 'त्या'च्याबरोबरचा फोटो पोस्ट करत म्हणाली, "नवीन सुरुवात..."
'थुडरम' चित्रपटाने १३ दिवसात जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
मोहनलाल व शोभना यांची प्रमुख भूमिका असलेला 'थुडरम' हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. बुधवारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३.८५ कोटींचा गल्ला जमवला. १३ दिवसात या चित्रपटाने ८३. ६० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
मराठी अभिनेत्रीने केले राखी सावंतचे कौतुक; म्हणाली, "मला तिच्याबद्दल आदर आहे"
श्रीकृष्णाच्या भूमिकेत झळकणार आमिर खान? 'महाभारत' चित्रपटाबद्दल म्हणाला, "माझ्यावर त्यांचा खूप प्रभाव…"
चाळिशीत असताना साकारली १८ वर्षीय मुलाची भूमिका; आर. माधवनने सांगितला '३ इडियट्स' चित्रपटातील 'तो' किस्सा, म्हणाला…
माफी मागूनही सोनू निगमवर कन्नड लोकांचा रोष कायम, चित्रपटातून गायलेलं गाणं हटवलं
नीना गुप्ता यांचं मसाबाच्या जन्मानंतरही होतं विवाहित विवियन रिचर्ड्सबरोबर अफेअर; म्हणाल्या, "मी त्याला फोन केला अन्…"
शिव ठाकरेचा 'हा' व्हिडीओ पाहिलात का?
सोशल मीडियावर शिव ठाकरेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याची आजी देखील दिसत आहे. 'व्हायरल भयानी' या चॅनेलने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reel/DJWsUYkz9Ko/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
ईशा देओल घटस्फोटानंतर पहिल्यांदाच एक्स पतीबद्दल म्हणाली, "मी आणि भरत…"
गोव्यात गावरान ब्रोज आणि सिटी सुंदरी करणार इव्हेंट मॅनेजमेंट
'चल भावा सिटीत' हा शो सध्या लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या स्पर्धकांना नवनवीन टास्क देण्यात येत आहे. आता गावरान ब्रोज आणि सिटी सुंदरी यांना इव्हेंट मॅनेजमेंट करावे लागणार आहे. याचा प्रोमो 'झी मराठी' वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reel/DJYNZGJvBup/?utm_source=ig_web_copy_link
रितेश देशमुख (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या