टीव्हीवरचा लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती १४’ दिवसेंदिवस मनोरंजक होत आहे. नेहमीप्रमाणेच यंदाचा सिझनही बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन होस्ट करत आहेत. KBC च्या १४ व्या सीझनमध्ये एक युवा स्पर्धक आयुष गर्ग करोडपती बनण्यासाठी पोहोचला. व्यावसायिक असलेल्या आयुषने हा खेळ उत्तमरित्या खेळला. एक कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचणारा आयुष हा या सीझनमधील हा पहिला स्पर्धक आहे. सध्या त्याला एक कोटी रुपयांसाठी प्रश्न विचारण्यात आला. मात्र, त्याचं उत्तर चुकलं. तर तो प्रश्न कोणता होता हे जाणून घेऊयात.

हेही वाचा – ‘या’ कलाकारांचे होते को-स्टारशी अफेअर; पण ब्रेकअपनंतर निवडले इंडस्ट्रीबाहेरचे पार्टनर

bjp to defeat mamta banerjee in loksabha
ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
Government decision not to increase read reckoner for elections
रेडीरेकनर वाढीला निवडणुकीची वेसण; घरांच्या किमती घटणार? रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीवर काय परिणाम?
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

आयुष एकामागून एक प्रश्नांची अचूक उत्तरं देत ७५ लाख रुपयांच्या म्हणजेच अमृत द्वारपर्यंत पोहोचला. त्याला ७५ लाख रुपयांसाठी अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारला. १९७४ मध्ये जेव्हा भारतीय संघाने देशाशी खेळण्यास तत्वतः नकार दिला तेव्हा कोणत्या देशाने डेव्हिस कप फायनल सामना न खेळता जिंकला? असा तो प्रश्न होता. त्यासाठी चीन, अफगाणिस्तान, इस्रायल आणि दक्षिण आफ्रिका हे चार ऑप्शन देण्यात आले होते. या कठीण प्रश्नाचे उत्तर द्यायला आयुषला बराच वेळ लागला. त्याच्याजवळ लाइफलाइन नव्हती. कारण याआधीच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्याने तिन्ही लाइफलाइन वापरल्या होत्या. पण आयुषने रिस्क घेत दक्षिण आफ्रिका हा पर्याय निवडला. त्याचं उत्तर बरोबर होतं आणि त्याने ७५ लाख रुपये जिंकले. यानंतर तो एक कोटींचं बक्षिस असलेल्या प्रश्नावर पोहोचला.

हेही वाचा – “मी आईच्या मैत्रिणीसोबत सेक्स केल्याचं समजताच…”; ‘लॉक अप’ फेम शिवम शर्माने सांगितली कुटुंबीयांची प्रतिक्रिया

प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन ७५ लाख रुपये जिंकणारा आयुष या सीझनचा पहिला स्पर्धक ठरला आहे. यानंतर शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी आयुषला एक कोटी रुपयांचा प्रश्न विचारला. प्रश्न असा होता की, ‘कोणत्या पर्वतावर एखाद्या व्यक्तीने पहिल्यांदाच 8 हजार मीटरवरील उंच शिखरावर चढाई केली होती?’ त्यासाठी अन्नपूर्णा, ल्होत्से, कांचनजंगा आणि मकालू हे पर्याय देण्यात आले होते. प्रश्न कठीण होता आणि आयुषकडे एकही लाइफलाइन नव्हती. त्याने ७५ लाखांचा टप्पा ओलांडला असल्याने रिस्क घेत ‘ल्होत्से’ असं उत्तर दिलं पण ते चुकीचं होतं. तर, या प्रश्नाचं योग्य उत्तर ‘अन्नपूर्णा’ होतं.