Biggest box office openers of 2018 : ‘या’ पाच चित्रपटांनी पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई

२०१८ मधले पहिल्याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणारे चित्रपट कोणते हे पाहणार आहोत.

बहुचर्चित ‘संजू’ चित्रपटाला या वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली होती.

बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांसाठी २०१८ हे वर्षे महत्त्वाचं आहे. कारण  या वर्षांत बॉलिवूडमधल्या अनेक बड्या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित झाले. तर पुढील सहा महिन्यात आणखी बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सहा महिन्यात सलमान, करिना, दीपिका, रणबीर, आलिया, रणबीर अमिताभ बच्च यांच्यासह अनेक कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित झाले.  तर येत्या काही  महिन्यांत अक्षय कुमार, हृतिक रोशन यांचेही महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या आठवड्यात अभिनेता संजय दत्तच्या आय़ुष्यावर आधारित ‘संजू’ चित्रपट प्रदर्शित झाला. अपेक्षेप्रमाणे तुफान प्रतिसाद या चित्रपटाला लाभला. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा गेल्या सहा महिन्यातला ‘संजू’ हा पहिला चित्रपट ठरला आहे. तर या निमित्तानं आपण २०१८ मधले पहिल्याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणारे चित्रपट कोणते हे पाहणार आहोत.

संजू
बहुचर्चित ‘संजू’ चित्रपटाला या वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने घसघशीत कमाई केली आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी ३४. कोटी ७५ लाखांची विक्रमी कमाई केली आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूरनं संजय दत्तची भूमिका साकारली आहे.

रेस ३
‘संजू’ पूर्वी सलमानच्या रेस ३ नं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली होती. ईदला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं २९. १७ कोटींची कमाई पहिल्याच दिवशी केली होती. सलमानच्या पूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटापेक्षा हे आकडे कमीच होतेच.

बाघी २
टायगर श्रॉफ आणि दिशा पटनीची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी २५. १० कोटींची कमाई केली होती. ‘बाघी २’ हा २०१८ मधला सुपरहिट चित्रपट ठरला. ‘बाघी’पेक्षा ‘बाघी २’ ला प्रेक्षकांचा सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला.

पद्मावत
वादात सापडलेल्या ‘पद्मावत’ सिनेमानं पहिल्याचं दिवशी १९ कोटींची कमाई केली केली. दीपिका, रणवीर आणि शाहिदची प्रमुख भूमिका असलेला ‘पद्मावत’ हा जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता. गेल्यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता.

विरे दी वेडिंग
करिना कपूर, स्वरा भास्कर, सोनम कपूर, शिखा यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘विरे दी वेडिंग’ला प्रेक्षकांकडून समिश्र प्रतिसाद लाभला. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी १० कोटींची कमाई केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: List of biggest box office openers movie of

ताज्या बातम्या