मराठीतील दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालंय. ते पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले. सध्या त्यांचा मृतदेह तळेगाव दाभाडे इथं शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांचा मुलगा व अभिनेता गश्मीर महाजनी तळेगावला पोहोचला आहे. गश्मीने वडिलांबरोबर तीन चित्रपटात एकत्र काम केलं होतं. एकदा त्याने त्याला आवडणाऱ्या वडिलांच्या चित्रपटाविषयी सांगितलं होतं.

“आठ महिन्यांपासून एकटेच राहत होते रवींद्र महाजनी”, पोलिसांची माहिती; म्हणाले, “मुलगा गश्मीरलाही…”

“मी १६-१७ व्या वर्षानंतर वडिलांचे चित्रपट पाहू लागलो. त्यांना मिळणारी प्रसिद्धी, लोकांचं प्रेम मी लहानपणापासून पाहत आलोय. त्यामुळे त्यांच्या कामाबद्दल मला फार कुतुहल होतं. मला बाबांचा सर्वात जास्त आवडलेला चित्रपट ‘मुंबईचा फौजदार’ आहे, हा एव्हरग्रीन चित्रपट मला आजही आवडतो. ‘झुंज’, ‘देवता’ हे चित्रपटही पाहिले आहेत, ते खूप सुंदर सिनेमे आहेत. पण, निर्मात्याने कोणताही बदल न करता एखादा चित्रपट जशाचा तसा बनवावा असा चित्रपट मला ‘मुंबईचा फौजदार’ वाटतो,” असं गश्मीर म्हणाला होता.

“मी स्मार्ट आहे, पण बाबा…”, देखण्या रवींद्र महाजनींबद्दल लेक गश्मीरने केलेलं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रवींद्र महाजनी यांनी मुलाबरोबर तीन चित्रपटांमध्ये काम केलं होतं. गश्मीरच्या ‘कॅरी ऑन मराठा’ चित्रपटात ते झळकले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने या बाप-लेकाने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत गश्मीरने वडिलांच्या आवडत्या चित्रपटाबद्दल सांगितलं होतं.