आपल्या अभिनय आणि नृत्याने सगळ्यांना भुरळ घालणारी अभिनेत्री मानसी नाईक पुन्हा एकदा प्रेमात पडलीय. ‘बाई वाड्यावर या’, ‘मस्त चाललंय आमचं’, ‘रिक्षावाला’ अशा अनेक सुपरहिट गाण्यांवर तिनं आपल्या नृत्यकौशल्यानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. अभिनय, नृत्याबरोबरच मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते.

जानेवारी २०२१ मध्ये मानसीने बॉक्सर प्रदीप खरेराशी लग्नगाठ बांधली होती; पण दीड वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. त्याबद्दल अनेक मुलाखतींत मानसीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अशातच मानसी पुन्हा एकदा प्रेमात पडल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ‘हंच मीडिया’ला दिलेल्या मुलाखतीत मानसीनं याबद्दल खुलासा केला आहे.

हेही वाचा… “डोक्यातून रक्त वाहत होतं आणि…” जखम झाल्यावरही ‘त्या’ अभिनेत्याने सुरूच ठेवलं नाटक; चिन्मय मांडलेकर म्हणाला…

मानसी पॅरिस ट्रिपला गेली होती. तिथले काही फोटो मानसीने शेअर केले होते. पण, मानसीची एक स्टोरी लक्षवेधक ठरली. त्यात मानसीनं एका राहुल खिसमतरावबरोबरचा फोटो शेअर केला होता. मानसी म्हणाली, “मी माझा वाढदिवस पॅरिसमध्ये खूप छान रीतीनं साजरा केला. खूप छान केक कापला. मला खूप सुंदर गिफ्ट्सही मिळाली.

कोणासोबत वाढदिवस साजरा केला, असं विचारलं असता मानसी म्हणाली, “मी माझ्याबरोबर वाढदिवस साजरा केला. एक तर मी आहे आणि प्रेमामध्ये मला पूर्ण करणारीही ‘मी’ आहे. त्या ‘मी’बद्दल मी नक्कीच लवकर सांगेन.

हेही वाचा… जान्हवी कपूरने घातला बॉयफ्रेंड शिखरच्या नावाचा नेकलेस, फोटो चर्चेत

मॅडम, नक्कीच प्रेमात पडल्यात पुन्हा एकदा, असं मुलाखतदारानं विचारलं असता, मानसी म्हणाली, “मी पहिल्या दिवसापासून प्रेमातच होते. लोकांना कळत नाही मी काय करू?” मी माझ्याच प्रेमात आहे, असंही ती म्हणाली.

मानसी त्या स्पेशल व्यक्तीबाबत सांगताना पुढे म्हणाली, “पॅरिसचं प्रेमळ वातावरण होतं. खूप छान वाटलं. मी खूप वर्षांनंतर बाहेर फिरायला गेले होते. आई-वडिलांनी अगदी आवर्जून मला पाठवलं की, तुला जायलाच पाहिजे. त्यामागे एक कारण होतं. ते काय होतं ते मी सांगेनच. तिथे मला सरप्राईज देण्यात आलं. कारण- मला डोळ्यांवर पट्टी बांधून तिकडे नेण्यात आलं आणि मी आयफेल टॉवरच्या समोर उभी होते. हे माझं बर्थडे गिफ्ट होतं. मला सुंदर वेळ दिलाय कोणीतरी. मला फॉसिल वॉच मिळालं. त्याच्यावर काहीतरी स्पेशल कोरलंय. तर मला सुंदर वेळ देणाऱ्या व्यक्तीचं नाव मी लवकरच गुलदस्त्यातून बाहेर काढेन. पण बरं वाटलं की, असा कोणीतरी आहे; जो तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य बघायला काहीही करू शकतो.”

हेही वाचा… “४ महिन्यांची लेक एकटी…”, २६/११ ला पतीसह ताजमहाल हॉटेलमध्ये अडकलेली सोनाली खरे

मानसी जर्मनीमध्ये स्थित होणार असल्याचंही ती म्हणाली. मानसीचा होणारा नवरा शास्त्रज्ञ असल्याचं बोललं जातंय. जर्मनीत गेल्यावर अभिनेत्री पूजाला सावंतला आमंत्रण असेल आणि सगळं मराठमोळं असेल, असंही ती अप्रत्यक्षपणे म्हणाली. माझ्या चेहऱ्यावरचं हास्य खूप काही सांगून जातंय, असंही ती म्हणाली.

हेही वाचा… “…आणि मी ट्रेनमधून पडले”; मुक्ता बर्वेने सांगितला मुंबईत आल्यानंतरचा ‘तो’ अनुभव, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मानसी नाईक ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती आपले फोटो, व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांच्या संपर्कात असते. मानसीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झाल्यास ती मध्यंतरी तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. मानसी लवकरच तिच्या आयुष्याची मोठी अपडेट देईल, असं म्हटलं जातंय.