मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या आघाडीच्या नायिकांपैकी एक म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी. मालिका, चित्रपट या माध्यमांमध्ये प्राजक्ताने आपल्या सहजसुंदर अभिनयाने स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. तिच्या अभिनयाचा जितका चाहता वर्ग आहे, तितकाच तिच्या नृत्याचा, सौंदर्याचादेखील चाहता वर्ग तयार झाला आहे. अभिनयाबरोबर ती उत्तम कवयित्री, निवेदक, व्यावसायिका आणि निर्माती आहे. अशी ही हरहुन्नरी अभिनेत्री सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना प्राजक्ता माळींसह काही अभिनेत्रींची नावं घेतली. ज्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडली आहे. उलट-सुलट चर्चा होतं असल्यामुळे प्राजक्ताने आक्रमक पावित्रा घेतला आहे. तसंच कोणत्याही पुराव्याशिवाय ज्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत, त्यावर अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे. शिवाय, लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रकरणासंबंधित वस्तुस्थिती मांडून कठोर कारवाई मागणी करणार असल्याची माहिती प्राजक्ताने २८ डिसेंबरच्या पत्रकार परिषदेत दिली. आता या प्रकरणी मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी प्राजक्ताच्या समर्थनार्थ उतरताना दिसत आहेत.

हेही वाचा – Video: सलमान खानचा ५९वा वाढदिवस जामनगरमध्ये जल्लोषात साजरा, अंबानींनी आयोजित केलेली खास पार्टी, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री, लेखिका मुग्धा गोडबोले-रानडे हिने नुकतीच प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ फेसबुकवर पोस्ट शेअर केली. #isupportprajaktamali असं लिहित तिने लोकप्रिय निर्माते नितीन वैद्य यांनी मांडलेली भूमिका शेअर केली आहे. नितीन वैद्य यांनी फेसुबकवर प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे.

हेही वाचा – “प्राजक्ता ताई आम्ही तुझ्याबरोबर, ट्रोलिंगकडे लक्ष देऊ नको”, गौतमी पाटीलची प्रतिक्रिया; म्हणाली, “कलाकाराचं दुःख…”

नितीन वैद्य यांनी लिहिलं, “महाराष्ट्रातील राजकारणी आणि प्रसारमाध्यमं यांचा प्रवास विकृतीकडे सुरू झाला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याबरोबर सुसंस्कृत महाराष्ट्राने ठामपणे उभं राहिलं पाहिजे. कलाक्षेत्रातील वा कोणत्याही क्षेत्रातील महिलांची बदनामी हा पुरुषप्रधान मनोवृत्तीचाच एक भाग आहे. ही विकृती आहे.”

हेही वाचा – प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ उतरले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे दिग्दर्शक, पोस्ट करत म्हणाले, “ज्या समाजात महिलांचा सन्मान…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नितीश वैद्य यांच्या या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “अत्यंत चुकीचं घडत आहे. कोणत्याही महिलेचं यापद्धतीनं नाव घेणं फारच चुकीचं आहे. लोकप्रतिनिधी आणि माध्यमांकडून निदान याबाबतीत आता काहीही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “बाई दिसली की लाव लेबल ही घाणेरडी मनोवृत्ती आहे.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, मनोरंजन क्षेत्रातील सर्वांनी एकत्र येऊन अशा विकृतीचा निषेध आणि अब्रुनुकसानीचा दावा देखील करावा. पुन्हा अशी विकृती सहन करणे नाही. अशा अनेक नेटकऱ्यांनी नितीन वैद्य यांनी मांडलेल्या मताशी सहमती दर्शवली आहे.