scorecardresearch

‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील सीन कॉपी केल्यामुळे मालिका ट्रोल; ‘गुम है किसी…’ मालिकेवर प्रेक्षकांनी व्यक्त केला संताप

‘गुम है किसी प्यार में’ मालिकेचे कथानक सध्या रंजक वळणावर आहे.

‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील सीन कॉपी केल्यामुळे मालिका ट्रोल; ‘गुम है किसी…’ मालिकेवर प्रेक्षकांनी व्यक्त केला संताप
'गुम है किसी प्यार में' या मालिकेला सध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

स्टार प्लस वाहिनीवरील ‘गुम है किसी प्यार में’ ही हिंदी मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मालिकेतील विराट आणि सई या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. या मालिकेतील चव्हाण कुटुंबावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. अभिनेता नील भट मालिकेत आयपीएस ऑफिसर विराट चव्हाण ही मुख्य भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री आयेशा सिंह डॉक्टर सईच्या भूमिकेत आहे. या मालिकेत विराटची वहिनी आणि तिसरं मुख्य पात्र असलेली ‘पत्रलेखा’ ही भूमिका अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा साकारताना दिसत आहे. याशिवाय मालिकेत किशोरी शहाणे, भारती पाटील, शैलेश दातार, सिद्धार्थ बोडके या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘कुसुम डोला’ या बंगाली मालिकेचा रिमेक असलेल्या ‘गुम है किसी प्यार में’ या मालिकेला सध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

‘गुम है किसी प्यार में’ मालिकेचे कथानक सध्या रंजक वळणावर आहे. सई आणि विराटच्या बाळाला पाखीने(पत्रलेखा) सरोगसीच्या माध्यमातून जन्म दिला आहे. विशेष म्हणजे मालिकेत पाखीची डिलिव्हरी विराटने केली असल्याचं दाखवण्यात आलं आहे. ५ आणि ६ ऑगस्ट रोजी प्रसारित झालेल्या भागात सईची मदत घेऊन विराटने मेडिकलचं कोणतंही प्रशिक्षण नसताना पाखीची डिलिव्हरी केली. मालिकेतील हे भाग पाहिल्यानंतर प्रेक्षकांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील सीनची आठवण झाली.

‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील डिलिव्हरीच्या सीनप्रमाणेच हा भागही चित्रित करण्यात आला आहे. चित्रपटात करीना कपूर आमिर खानला तिच्या बहिणीची डिलिव्हरी करण्यासाठी मार्गदर्शन करते. अगदी त्याचप्रमाणे सईही व्हिडीओ कॉलद्वारे विराटला पाखीची डिलिव्हरी करण्यासाठी सांगत असल्याचं मालिकेत दाखवण्यात आलं आहे. चित्रपटाप्रमाणेच जन्माला आल्यानंतर मालिकेतील बाळही रडत नव्हते. या मालिकेतील प्रसारित झालेल्या भागाच्या व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : “सिद्धार्थने पहिल्याच दिवशी १२ ऑम्लेट…”, मकरंद अनासपुरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

थ्री इडियट्स चित्रपटातील सीन कॉपी केल्यामुळे या मालिकेवर प्रेक्षक संतापले आहेत. याआधीही ‘गुम है किसी प्यार में’ मालिकेला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मालिकेतील पाखीने बेकायदेशीर पद्धतीने सरोगसी करून घेतल्याचं दाखवण्यात आलं होतं. मालिकेत अशा पद्धतीने दाखविण्यात आलेल्या कथानकामुळे प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला होता. तेव्हाही मालिकेला ट्रोल करण्यात आलं होतं.

हेही वाचा : ‘कुठे आसामला नेणार का?’, देवेंद्र फडणवीसांचा फोटो पाहताच अमृता फडणवीसांनी विचारलेल्या प्रश्नावर पिकला हशा

‘गुम है किसी प्यार में’ मालिकेत प्रेक्षकांना आणखी ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागात कथानक आठ वर्ष पुढे गेलेले प्रेक्षकांना दिसेल. सईही पुढे एका मुलीला जन्म देणार असल्याचं मालिकेत दाखवण्यात येणार आहे. या मालिकेचा मराठीतही रिमेक करण्यात आला आहे. स्टार प्रवाहवर सध्या सुरू असलेली ‘लग्नाची बेडी’ ही मालिका याच मालिकेचा रिमेक आहे.  

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.