शोएब इब्राहिमने दिली वडिलांची हेल्थ अपडेट; म्हणाला,”पुढील ७२ तास गंभीर आहेत पण……”

शोएबने इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करत म्हणाला……

shoaib-ibrahim-instagram
Photo-Shoaib Ibrahim Instagram

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता शोएब इब्राहिमच्या घरी सध्या तणावाचे वातावरण आहे. त्याच्या वडिलांना ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आल्याचे शोएअबने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून सांगितले होते. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून फॅन्सना वडिलांसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केले होते. ते सध्या आयसीयूमध्ये असल्याचे त्याने सांगितले आहे. आता शोएबने त्याच्या फॅन्सना त्यांची हेल्थ अपडेट दिली आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्याने त्याच्या चाहत्यांना वडिलांच्या तब्येतीबद्दल माहिती दिली आहे.

अभिनेता शोएब इब्राहिम आणि त्याची पत्नी दीपिका कक्कड नेहमीच आपल्या चाहत्यांशी सगळ्या गोष्टी शेअर करताना दिसतात. शोएबने इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या वडिलांच्या प्रकृती बाबत अपडेट दिली आहे. त्याने त्या स्टोरीत सांगितले की, “पुढील ७२ तास क्रिटिकल आहेत. वडिलांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांच्या शरीराच्या डाव्या बाजूला अर्धांगवायू झाला आहे. त्यांना बोलताना पण त्रास होत आहे. वडील आयसीयूमध्ये असल्याने मला दिवसातून दोन वेळा भेटायची परवानगी आहे.” वडिलांसाठी प्रार्थना सुरू ठेवण्याची  विनंती शोएब या व्हिडीओत करताना दिसला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Ibrahim (@shoaib2087)

२६ जुलै रोजी शोएबने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले की, “पुन्हा एकदा तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. वडिलांना सकाळी ब्रेन स्ट्रोक आला होता आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कृपया तुम्ही प्रार्थना करा की ते लवकर बरे होतील.” याआधी फेब्रुवारीमध्ये सुद्धा शोएबच्या वडिलांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळेस त्याने वडिलांसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोसोबतंच त्याने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले होते. तो म्हणाला होता की, “सगळ्यांचे आभार, माझ्या वडिलांची आज सर्जरी झाली, आता त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. देवाच्या कृपेने काही दिवसांतच ते चालायला सुरुवात करतील.”

Shoaib-Ibrahim
Photo-shoaib Ibrahim Instagram story

शोएब इब्राहिमने ‘रहना हैं तेरी पलकों के छाओं में’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून तो घराघरात पोहचला. शोएबने २०१८ साली ‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्री दीपिका कक्कडशी लग्न केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Next 72 hours are critical televsion actor shoaib ibhraim gave update about his fathers health aad