सैफ अली खानची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खान ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. कधी कार्तिक आर्यनमुळे तर कधी शुभमन गिलमुळे सारा कायम चर्चेचा विषय असते. सारा कामावर लक्ष देत नाही अशी सतत तक्रार करणाऱ्यांसाठी अभिनेत्रीने एका नव्या धमाकेदार प्रोजेक्टची घोषणा केली आहे. सारा सध्या तिच्या आगामी ‘गॅसलाइट’ चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये तिच्याबरोबर विक्रांत मॅसी आणि चित्रांगदा सिंग हे कलाकार दिसणार आहेत.

काही दिवसांपूर्वी ओटीटीवर या चित्रपटाबद्दल माहिती समोर आली होती, तर नुकतीच या कलाकारांनी चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. सारा अली खान, विक्रांत मॅसी, चित्रांगदा सिंग यांचा आगामी चित्रपट ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर प्रदर्शित होणार आहे. नुकताच सारा, विक्रांत आणि चित्रांगदा यांनीही एका मजेदार व्हिडिओसह त्याची तारीख जाहीर केली आहे. या प्रोमो व्हिडिओमध्ये विक्रांत, सारा आणि चित्रांगदा तिघे एका लिफ्टमध्ये अडकलेले दिसत आहेत.

आणखी वाचा : “आम्ही तिसऱ्या मजल्यावरुन..” अमिताभ बच्चन यांना ‘मेजर साब’च्या सेटवर झालेल्या दुखापतीबद्दल अजय देवगणचा खुलासा

या मजेदार व्हिडिओमध्ये, दोन्ही कलाकार त्यांच्या भूतकाळातील चित्रपटांवरुन एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. हा मजेशीर प्रोमो पाहिल्यानंतर हा चित्रपट विनोदी असेल असा अंदाज तुम्ही बांधला असेल तर तो साफ चुकीचा आहे. हा चित्रपट एका मर्डर मिस्ट्रीभोवती फिरणार आहे. एकूणच या प्रोमोचं सादरीकरण हटके पद्धतीने केलेलं असल्याने प्रेक्षक या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक असल्याचं कळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘केदारनाथ’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या साराचा हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. प्रथम हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार होता पण निर्मात्यांनी हा ‘गॅसलाइट’ डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करायचा निर्णय घेतला होता. ओटीटीवर प्रदर्शित होणारा सारा अली खानचा हा दुसरा चित्रपट असेल. यापूर्वी त्याचा ‘अतरंगी रे’ हा चित्रपटही हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता.