अशोक सराफ आणि प्रशांत दामले हे मनोरंजन सृष्टीतील दोन दिग्गज कलाकार. आपल्या अभिनयाने आणि हजरजबाबीपणाने गेली अनेक वर्ष ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. ‘आयत्या घरात घरोबा’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’, ‘प्रेमांकुर’, ‘आनंदी आनंद’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे. गेल्या काही वर्षात त्यांनी स्क्रीन शेअर केला नसला तरी त्यांच्यातलं प्रेम आणि जिव्हाळा हा आजही तसाच आहे. आता नुकतंच प्रशांत दामले यांनी अशोक मामा त्यांना कोणत्या नावाने हाक मारतात हे गुपित उघड केलं आहे.

प्रशांत दामले हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. विविध पोस्ट शेअर करत ते त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांना सांगत असतात. त्याचबरोबर त्यांच्या नाटकांच्या प्रयोगांची माहिती, प्रयोगादरम्यान किमात प्रयोगाच्या दौऱ्यादरम्यान घडणारे किस्से चाहत्यांची शेअर करत असतात. आता नुकताच त्यांनी एक फोटो पोस्ट केला होता. त्यावर त्यांच्या चाहत्याने केलेल्या कमेंटवर प्रशांत दामले यांनी दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे.

आणखी वाचा : ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ला फालतू आणि दर्जाहीन म्हणणाऱ्याला प्रशांत दामलेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले…

प्रशांत दामले यांनी मकर संक्रांतीनिमित्त ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या नाटकाच्या टीमबरोबर एक फोटो पोस्ट करत चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यावर कमेंट करत त्यांच्या एका चाहत्याने लिहिलं, “सेम टू यू. दांबले सर, पुन्हा हा प्रयोग गडकरी रंगायतन ठाणे येथे कधी होईल? वाट पाहतोय.” यावर उत्तर देत प्रशांत दामले यांनी अशोक मामा त्यांना काय हाक मारतात याचा खुलासा केला. प्रशांत दामले यांनी लिहिलं, “दांबले हे आवडलं. अशोकमामा मला प्रेमाने अशी हाक मारतो.” त्यांच्या या उत्तरावर त्यांच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा : स्पृहा जोशीचा युट्यूब चॅनेल हॅक, माहिती देत अभिनेत्री म्हणाली, “आता सगळे व्हिडीओ…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्रशांत दामले यांची ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ आणि ‘सारखं काहीतरी होतंय’ ही दोन नाटकं रंगभूमीवर सुरु आहेत. या दोन्ही नाटकांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय.