आपल्या स्लो मोशन डान्ससाठी ओळखला जाणारा डान्सर, सूत्रसंचालक राघव जुयाल सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो एका विचित्र भाषेत सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या भाषेत तो गुवाहाटीमध्ये राहणाऱ्या एका स्पर्धकाला डान्सच्या परफॉर्मन्ससाठी मंचावर बोलवत असल्याचे दिसत आहे. मात्र त्याला या भाषेमुळे वर्ण द्वेष करणार असे सांगत ट्रोल केले जात आहे. दरम्यान यानंतर नुकतंच राघवने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

राघवने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. “गेल्या काही दिवसांपासून एवढ्या मोठ्या शो मधील एक छोटीशीची व्हिडीओ क्लिप ही व्हायरल होत आहे. ज्याद्वारे मला वर्ण द्वेष करणारा असे म्हटलं जात आहे. यावरुन माझ्यावर विविध आरोप प्रत्यारोपही केले जात आहे. मला त्याबाबत स्पष्टीकरण द्यायचे आहे. यामागची संपूर्ण कथा मला तुम्हाला सांगायची आहे,” असे त्याने व्हिडीओच्या सुरुवातीला म्हटलं आहे.

राघव जुयालचे स्पष्टीकरण

“तुम्ही हा पूर्ण शो बघा आणि त्यानंतर मला जज करा. माझ्यासाठी आणि जे मला ओळखतात त्यांच्यासाठीदेखील. एक छोटीशी मुलगी गुंजन ती आसाममधील गुवाहटीमधून या शोमध्ये आला होती. आम्ही अनेकदा मुलांना विचारतो की तुमचा छंद काय आहे. तुम्ही डान्स तर करायला आला आहात पण इतर काही छंद आहेत का? यावर गुंजन म्हणाली होती की मी गिबरीश चायनीज भाषेत बोलू शकते. माझ्याकडे ते टॅलेंट आहेत. ती हे बोलल्यानंतर आम्ही सर्वजण हसायचो. कारण ती लहान मुलं आहेत त्यांचा छंद काहीही हसू शकतात. जेव्हा गुंजनने आम्हाला सांगितले की ती चायनीज भाषेत बोलू शकते तेव्हा आम्ही टाळ्या वाजवल्या. त्यानंतर आम्ही तिला बोलून दाखव असे सांगितले. तिने बोलून दाखवल्यानंतर हा संपूर्ण किस्सा सुरु झाला.”

“यानंतर अनेक भागात तिला आम्ही हे चायनिज भाषेत बोलूना दाखव असे सांगायचो. आता दुसऱ्या भाषेत बोलून दाखव, असे तिला गमतीत सांगायचो. अशाच प्रकारे या कार्यक्रमातील शेवटच्या काही भागात मी तिला तिच्या भाषेत बोलवले. कारण ती आधीच्या सर्व भाषेत ते बोलली होती. मी गंमत म्हणून तिला ते म्हणालो.”

“माझे कुटुंब ईशान्यकडे राहते. माझे अनेक मित्र, नातेवाईक जे सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड अशा भागात राहतात. मी असा व्यक्ती आहे जो प्रत्येक चुकीच्या गोष्टी सुधारत असतो. तसेच एखाद्या चुकीच्या गोष्टीबद्दल मी पुढाकार घेतला तर मला शिव्याही पडतात. यातून तुम्हाला काही चुकीचे वाटलं असेल तर मी खरच क्षमा मागतो. यात माझा, कलर्स चॅनलचा कोणताही हेतू नव्हता. कोणताही व्हिडीओ व्हायरल करण्यापूर्वी त्या भागाच्या आधी काय झाले ते बघा आणि नंतर त्याबद्दल गैरसमज करुन घ्या,” असे राघव म्हणाला.

नेमकं प्रकरण काय?

कलर्स या हिंदी वाहिनीवर डान्स दिवाने या नावाचा एक रिअॅलिटी डान्स शो आयोजित केला जातो. डान्सर राघव जुयाल हा या शोचे सूत्रसंचालन करतो. तर प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा, तुषा कालिया, धर्मेश येलांडे आणि माधुरी दीक्षित हे दिग्गज परीक्षक म्हणून उपस्थित असतात. गेल्या काही दिवसांपासून राघवचा या शो मधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यात राघव हा एका स्पर्धकाचा वादग्रस्त पद्धतीने परिचय करुन देतो. यात तो मंचावर एका वेगळ्या भाषेत बोलतो. या भाषेत चर्चा केल्यानंतर तो त्या मुलीला परफॉर्मन्ससाठी मंचावर बोलवतो.

मात्र त्याच्या या गमतीशीर वागण्यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे. अनेकजण त्याच्यावर आरोप करत आहे. तसेच त्याला काहीजण Racist असेही म्हणताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्याच्या या व्हिडीओवर आसाममधील अनेकांना नाराजीही व्यक्त केली आहे.