लग्नानंतर राहुल वैद्यने पत्नी दिशा परमार सोबतचा फोटो केला शेअर; कॅप्शन वाचून तुम्ही सुद्धा प्रेमात पडाल

लग्नानंतर हनीमूनला जाण्याऐवजी या जोडीने घरीच कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतलाय. राहुलने शेअर केलेल्या फोटोपेक्षा जास्त आकर्षक फोटोसोबतची कॅप्शन आहे.

Rahul-Disha-1200-2
(Photo: Israni Photography/Instagram)

काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेले क्यूट कपल राहुल वैद्य आणि दिशा परमार आता लग्नानंतर गुलाबी क्षणांना एन्जॉय करत आहेत. लग्नानंतर हनीमूनला जाण्याऐवजी या जोडीने घरीच कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतलाय. नुकतंच या दोघांचे गृहप्रवेश आणि लग्नानंतरची पुजा करतानाचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आतापर्यंत या दोघांनी लग्नातील अनेक फोटोज आणि व्हिडीओज शेअर केले आहेत. पण लग्नानंतर राहुल वैद्यने पहिल्यांदाच पत्नी दिशा परमारसोबतचा फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये दोघेही खूपच क्यूट दिसून येत आहेत. या फोटोपेक्षा ही जास्त आकर्षक फोटोसोबतची कॅप्शन आहे.

१६ जुलै रोजी राहुल वैद्य आणि दिशा परमार यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर बरोबर एक आठवड्याने राहुलने पत्नी दिशासोबतचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. “मिस्टर अ‍ॅण्ड मिसेजचा सगळ्यात पहिला फोटो” असं लिहित त्याने हा फोटो शेअर केलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by RAHUL VAIDYA RKV (@rahulvaidyarkv)

राहुलने शेअर केलेला हा फोटो त्यांच्या रिसेप्शन पार्टीमध्ये क्लिक केलेला आहे. या फोटो त्याने आज इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. त्यांच्या रिसेप्शन पार्टीत दिशाने मॅटेलिक साडी परिधान केली होती. तर राहुल वैद्य ब्लॅक अॅण्ड व्हाइट डिजाइनर सूटमध्ये खूपच हॅंडसम दिसून येत होता. दोघांच्या लग्नानंतरचा पहिला फोटो असल्याने या फोटोवर त्यांचे फॅन्स कमेंट्स करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देताना दिसून येत आहेत.

लग्नानंतर गेले नाही हनीमूनला

अनेकदा बरेच सेलिब्रिटी लग्नानंतर एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवता यावा यासाठी हनीमूनचा प्लान करतात. पण राहुल-दिशाने सध्या तरी हनीमूनचा कोणता प्लान केलेला नाही. हनीमूनला गेले नसले तरी ते व्हेकेशन एन्जॉय करताना दिसून आले. सध्या हे दोघेही त्यांच्या कुटुंबीयांसोबत क्वालिटी टाईम घालवताना दिसून येत आहेत. नुकतंच राहुलच्या घरी एका पुजेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दिशा एका मराठी सुनेच्या रूपात सजलेली दिसून आली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rahul vaidya shared the first picture with wife disha parmar after marriage prp

ताज्या बातम्या