‘आरआरआर’ च्या सेटवरील राम चरणचे कॅण्डीड फोटोज व्हायरल; पूर्ण झालं चित्रपटाचं शूटिंग

एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ चित्रपटासाठी अनेक चाहते प्रतिक्षेत आहेत. या चित्रपटाच्या मेकर्सनी चित्रपटाच्या शूटिंगबाबत नवी अपडेट जाहीर केलीय.

ram-charans-candid-photos-from-the-sets-of-rrr-goes-viral

‘बाहूबली’ फेम दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटासाठी अनेक चाहते प्रतिक्षेत आहेत. सर्व चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाच्या मेकर्सनी चित्रपटाच्या शूटिंगबाबत नवी अपडेट जाहीर केलीय. गेल्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरू केल्यानंतर करोनाच्या पहिल्या लाटेमुळे शूटिंग थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर करोना संकट शमल्यानंतर पुन्हा या चित्रपटाचं शूटिंग ठप्प झालं. एका मोठ्या ब्रेकनंतर आता या चित्रपटाचं शूटिंग पुन्हा सुरू झालंय. दोन गाणे सोडले तर चित्रपटाचं जवळजवळ सर्वच शूटिंग पूर्ण झालंय. ‘आरआरआर’च्या सेटवर शूटिंग सुरू झाल्यानंतरचे फोटोज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतायत.

‘मेगा पॉवर’ स्टार राम चरण आणि ‘यंग टायगर’ ज्यूनिअर नटरवलाल हे दोघेही काही दिवसांपूर्वीच शूटिंगच्या सेटवर कामाला लागले आहेत. गेल्या आठवड्यातच या दोघांनी उर्वरित शूटिंग पूर्ण केलंय. हा चित्रपट तेलुगू, तमिळ, मल्याळमसह एकूण 10 भाषेत प्रदर्शित होणार आहे. त्यामूळे राम चरण आणि ज्यूनिअर नटरवलाल या दोघांनी चित्रपटाच्या दोन भाषेतील डबिंगचं काम पूर्ण केलंय. उर्वरित भाषेतील डबिंगचं काम देखील लवकरच पूर्ण होणारेय. त्यामूळे चाहत्यांच्या उत्साहात आणखी वाढ व्हावी यासाठी चित्रपटच्या मेकर्सनी सेटवरील शूटिंगचे काही फोटोज शेअर केले आहेत. हे फोटोज सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत.


चित्रपटाचे चाहते देखील हे फोटोज शेअर करून चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होऊन लवकरच हा चित्रपट बघता येणार असल्याची प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. या फोटोंमध्ये रामने काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि पॅन्ट परिधान केलेली असून पायात शूज परिधान केलेत.

२०२१ मधील बहूप्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक राजमौली यांचा ‘आरआरआर’ चित्रपट ठरलाय. या चित्रपटाची कथा दोन भारतीय स्वतंत्रता सेनानी-अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं पोस्टर देखील शेअर करण्यात आलंय.

राम चरण आणि ज्यूनिअर नटवरलाल हे दोघेही मुख्य भूमिकेत असून त्यांच्यासोबत अजय देवगण अभिनेत्री आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ram charans candid photos from the sets of rrr goes viral prp

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या