बिग बॉस या कार्यक्रमाची चर्चा कायमच होत असते, मग तो हिंदी असो किंवा मराठी. यात येणारे कलाकार त्यांच्यातील वादविवाद, खेळ यामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. सध्या मराठी बिग बॉसची चर्चा आहे. लवकरच मराठी ‘बिग बॉस’ सुरु होत आहे. महेश मांजरेकर पुन्हा एकदा सूत्रसंचालक भूमिकेत दिसणार आहेत. हिंदीत लाडका भाईजान अर्थात सलमान खान सूत्रसंचालन करत असतो. नवीन पर्वाचा प्रोमो लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेक वादग्रस्त सेलिब्रिटींच्या नावांचा अंदाज लावला जात आहे. यात एका दिग्दर्शकाचं नाव देखील घेतलं जात आहे.

हे बेबी, हाऊसफुल्लसारख्या चित्रपटाचा दिग्दर्शक साजिद खान हा नव्या पर्वामध्ये दिसणार अशी चर्चा आहे. न्यूज १८ च्या वृत्तानुसार, ‘साजिद खानला आगामी पर्वामध्ये घेण्याचा निर्माते प्रयत्न करत आहेत. निर्माते काही असामान्य लोकांना एकत्र आणून हा कार्यक्रम मसालेदार करण्याचा विचार करत आहेत. जर साजिद खान यात सामील झाला तर त्यांना आणखीन फायदा होणार आहे’.

गौरी खानबद्दल विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर शाहरुख म्हणाला, ‘मी अशा… ‘

निर्मात्यांच्या मते ‘जर साजिदने अंतिम स्पर्धकांपैकी एक म्हणून निवड केली, तर आम्ही अपेक्षा करू शकतो की तो कार्यक्रमामध्ये त्याच्यावरील MeToo आरोपांबद्दल खुलासा करेल आणि चर्चा करेल’. २०१८ मध्ये अभिनेत्री सलोनी चोप्रा आणि एका पत्रकाराने साजिद खानवर छळ केल्याचा आरोप केला होता. अभिनेत्री उंगली फेम अभिनेत्री रेचेल व्हाईटनेदेखील साजिद खानवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हिम्मतवाला’ ‘हमशकल्स’ सारखे अपयश दिल्यानंतर, साजिद खान हाऊसफुल ४ द्वारे पुनरागमन करणार होता. तथापि, अशा आरोपांमुळे साजिदला या चित्रपटातून पायउतार होण्यास सांगण्यात आले आणि साजिद-फरहाद या दिग्दर्शक जोडीने चित्रपटाचा ताबा घेतला. ‘हाऊसफुल्ल’ चित्रपटाचे दोन भाग त्याने दिग्दर्शित केले होते.