महाराष्ट्राचे माजी मुूख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज जयंती आहे. वडिलांच्या जयंतीनिमित्त अभिनेता रितेश देशमुख भावूक झाला आहे. रितेशने एक भावनिक पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. तसेच त्याने एक फोटो देखील पोस्ट केला आहे. यामध्ये रितेशची दोन मुलं विलासराव देशमुख यांच्या फोटोला नमस्कार करताना दिसत आहेत. रितेशची ही पोस्ट पाहून त्याचं त्याच्या वडिलांवर असणारं प्रेम स्पष्टपणे दिसून येतं.

त्याने वडिलांसाठी खास पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे की, “मला तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुमच्या पायांना स्पर्श करुन मला आशिर्वाद घ्यायचा आहे. मला तुम्हाला पुन्हा एकदा हसताना बघायचं आहे. माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारत तुझ्याबरोबर मी नेहमीच आहे असं तुमचं बोलणं मला ऐकायचं आहे. हात धरत मला तुमच्याबरोबर चालायचं आहे. तुमचे पाय दाबत तुमच्याकडे एकटक पाहायचं आहे. मला तुम्हाला खेळताना, विनोद करताना, नातवंडांना खेळवताना, त्यांना गोष्टी सांगताना पाहायचं आहे. मला खरंच तुम्ही आता माझ्यासोबत हवे आहात.”

आणखी वाचा – धक्कादायक! पल्लवी डेच्या आत्महत्येनंतर २१ वर्षीय मॉडेल-अभिनेत्रीचा राहत्या घरीच आढळला मृतदेह, पोलीस तपास सुरु

रितेशने वडिलांसाठी शेअर केलेली ही खास पोस्ट खरंच डोळे पाणावणारी आहे. रितेश वडिलांना खूप मिस करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून रितेश देशमुख नेहमीच वडिलांच्या आठवणींना उजाळा देत असतो. त्याच्या या पोस्टला नेटकऱ्यांनाही पसंती दिली आहे. तुमची नेहमीच आठवण येते असं त्याला या पोस्टमधून वडिलांना सांगायचं आहे.

आणखी वाचा – VIDEO : “घटस्फोट म्हणजे खेळ नव्हे”, आमिर खान-किरण रावचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून संतापले लोक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रितेश आपल्या वडिलांबाबत प्रत्येकवेळी भरभरुन बोलताना दिसतो. त्यांनी आजवर केलेलं कौतुकास्पद काम याचा त्याला अभिमान आहे. वडिलांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा रितेशने जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत.