बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमानचे लाखो चाहते आहेत. आपला आवडता कलाकार दिसला की त्याच्यासोबत एक सेल्फी काढण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. मात्र, सलमानसोबत फोटो काढत असताना त्याच्या चाहत्यावर तो संतापला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

सलमानचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. सलमानचा एक चाहता त्याच्यासोबत फोटो काढण्याची विनंती करतो. सलमान फोटो काढण्यासाठी तयार होतो. सलमान फोटोग्राफर्ससमोर त्याच्या या चाहत्यासोबत पोज देत असताना. त्याचा चाहता मात्र, सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. हे पाहता सलमान बोलतो अरे ते फोटो काढत आहेत ना. चाहता त्याच्या फोन अॅडजेस्ट करत असल्याचं पाहून सलमान संतापला आणि म्हणाला, “नाचना बंद कर” आणि त्यानंतर तो चाहता थांबला. दरम्यान, ‘अंतिम’ या चित्रपटाच्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जात असताना सलमानसोबत ही घटना घडली आहे.

आणखी वाचा : फोटो बच्चन कुटुंबाचा पण चर्चा मात्र भिंतीवरच्या पेंटिंगची, किंमत ऐकलीत का?

आणखी वाचा : “पैसे टाकले म्हणून तिने राज कुंद्राशी लग्न केलं!”; अनिल कपूरच्या विधानावर शिल्पा शेट्टीने दिलं उत्तर, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलमान सध्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. या चित्रपटात सलनासोबत आयुष शर्मा देखील आहे. हा चित्रपट २६ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.